Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या शिंदे सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी 4 किंवा 5 जुलैला? संभाव्य कॅबिनेटमध्ये कुणाची वर्णी...

शिंदे सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी 4 किंवा 5 जुलैला? संभाव्य कॅबिनेटमध्ये कुणाची वर्णी पहा

0
260
जामखेड न्युज——
राज्यात सत्तांतर झालंय. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधी नुकताच पार पडला. पण कुठल्याही मंत्र्याचा शपथविधी झालेला नाही. आता लवकरच मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे. 4 किंवा 5 जुलैला हा शपथविधी पार पडेल, अशी माहिती आहे. खात्रीलायक सूत्रांकडूम ही माहिती मिळतेय.
मंत्र्यांचा शपथविधी 4 किंवा 5 जुलैला
नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. आता लवकरच मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. 4 किंवा 5 जुलैला हा शपथविधी पार पडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नगरविकास आणि गृह खातं फडणवीसांकडेच
नव्या सरकारमध्ये फडणवीसांकडे नगरविकास आणि गृहखातं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे,. शिंदे यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. अर्थ खातं हे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेच दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादा भुसेंकडे कृषी तर उदय सामंत यांच्याकडे शिक्षण खातचं ठेवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दीपक केसरकर यांनाही चांगलं खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बच्चू कडू, शंभुराज, सत्तारांना बढती
नव्या सरकारमध्ये बच्चू कडू, शंभुराज देसाई आणि अब्दुल सत्तार या राज्यमंत्र्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी या नेत्यांनी शिंदे यांच्याकडे फुल लॉबिंग केल्याचं सांगितलं जात आहे.
पंकजा मुंडेंना स्थान मिळणार नाही?
दरम्यान, नव्या सरकारमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संधी दिली जाणार नसल्यांच सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे या कोणत्याही सभागृहाच्या सदस्या नाहीत. शिवाय त्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!