जामखेड न्युज——
समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण १८ शासकीय वसतिगृहासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षा करिता अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

जिल्हातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग व अनाथ प्रवर्गातील शालेय विद्यार्थ्यांना इ.८ वी पासून पुणे इ.१० वी पर्यंत प्रवेश घेता येतो. (अपवाद: मांग/ मेहतर प्रवगोतील विद्यार्थाना इ.५ वी पासून पुढे १० वी पर्यंत प्रवेश घेता येतो.) शालेय विद्यार्थीसाठी १५ जुलै २०२२ पर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची मुदत आहे. कनिष्ठ महाविद्यालय प्रवर्गात इ. ११ वी च्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेता येतो. सदर प्रवेश अर्ज भरण्याची मुदत ३० जुलै २०२२ आहे. बिगर व्यावसायिक महाविद्यालय विभागात बी.ए./बी.कॉम / बी.एस.सी अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या आणि एम.ए / एम. कॉम. / एमएससी इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची मुदतही २४ ऑगस्ट २०२२ पर्यंत आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमास पदवी/पदविका / पदव्युत्तर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ३० सप्टेबर २०२२ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो. विद्यार्थ्याना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल तेथून अर्ज प्राप्त करून नमूद दिनांकापर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्याथ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत, अधिक माहिती साठी संबंधित शासकीय वसतिगृह तसेच अहमदनगर सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे संपर्क साधावा. असे आवाहन श्री.देवढे यांनी केले प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.









