जामखेड न्युज——
विद्यार्थी हेच आपले दैवत आहेत असे मानून त्याच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षकांनी विविध उपक्रम राबवावेत यातून विद्यार्थी प्रेरणा घेतील असे मत दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये 14 जून 2022 रोजीसहविचार सभा संपन्न झाली.
सहविचार सभेसाठी अध्यक्ष दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आदरणीय श्री अरुणशेठजी चिंतामणी साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव आदरणीय श्री शशिकांत देशमुख साहेब व प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग,
उपमुख्याध्यापक श्री श्रीधर जगदाळे,पर्यवेक्षक श्री रमेश अडसूळ उपस्थित होते.

या सहविचार सभेमध्ये दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव आदरणीय श्री शशिकांत देशमुख यांनी सर्व शिक्षकांना आवाहन केले की आपण वर्गांमधील शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना विविध उपक्रम राबवून त्यांचा शैक्षणिक व कलात्मक,सर्वांगीण विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या विषयानुसार वेगवेगळे उपक्रम घ्यावेत.
विविध प्रदर्शन,एखादा सामाजिक उपक्रम,
नाविन्यपूर्ण चार्ट द्वारे माहिती तयार करून शोकेस लावावी, खेळाच्या माध्यमातून काही नाविन्यपूर्ण माहिती देता येईल का, विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेबद्दल पूर्णपुणे माहिती व्हावी यासाठी काय उपक्रम घेता येईल का असेही सुचवले आदरणीय श्री शशिकांत देशमुख यांनी सर्व शिक्षकांना आपापल्या परीने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. महत्त्वाचे म्हणजे एखादा चांगला उपक्रम झाला तर तो संपूर्ण संस्थेमध्ये राबवता येईल जेणेकरून संस्थेतील सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल.
त्याचबरोबर आदरणीय प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनीही इतर उपक्रम तयार करताना सर्व सहकार्य करण्यात येईल विविध समित्या द्वारे अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला तो उपक्रम घेता येईल असे सुचवले. उपक्रम राबवताना त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होईल त्याचबरोबर तो सामाजिक असेल तरी चालेल असेही सांगितले.
त्याचबरोबर उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे व पर्यवेक्षक रमेश अडसूळ सर यांनीही उपक्रमांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले व शिक्षकांनी ही जास्तीत जास्त प्रयत्न करावा यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.
त्या आव्हानाला प्रतिसाद देत आज सर्व विषयावर शिक्षकांची चर्चा झाली. त्यामधून प्रवीण गायकवाड, बाळासाहेब पारखे,शहाजी वायकर,अनिल देडे,पोपट जगदाळे, भरत लहाने, बबनराव राठोड, राघवेंद्र धनलगडे,
संगीता दराडे विषय शिक्षकांची चर्चा होऊन उपक्रम घेण्याचे ठरवले.
त्याच बरोबर सर्व शिक्षकांनी आज एका नवीन उपक्रमास सुरुवात केली.नवीन शोकेस तयार केल्या व शोकेसमध्ये सर्व विषयांची नाविन्यपूर्ण माहिती चार्ट द्वारे लावून दर आठवड्याला ती बदलली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या त्या विषयातील जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण माहिती होईल.
या उपक्रमामध्ये शाळेतील सर्व शिक्षकांनी सुरुवात केलेली आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन आज संस्थेचे उपाध्यक्ष श्री अरुणशेठ चिंतामणी साहेब, सचिव श्री शशिकांत देशमुख खजिनदार श्री राजेशजी मोरे यांनी केले. यावेळी प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे,पर्यवेक्षक रमेश अडसूळ,शिक्षक प्रतिनिधी श्री रोहित घोडेस्वार सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी मुकुंद राऊत,संजय कदम,नरेंद्र डहाळे,विशाल पोले, आदित्य देशमुख,सुरज गांधी,साई भोसले,स्वप्निल जाधव,अजित सांगळे, हनुमंत वराट सर्वांनी या प्रकल्पाची तयारी केली. मराठी,हिंदी,इंग्रजी,गणित, इतिहास, भूगोल, खेळ, कार्यानुभव, चित्रकला सर्वच विषयांसाठी सर्व शिक्षक विषयावर चांगल्या प्रकारे उपक्रमांना सुरुवात यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल.









