Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या देहविक्रीला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता द्या – अमृता फडणवीस

देहविक्रीला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता द्या – अमृता फडणवीस

0
331
जामखेड न्युज – – – 
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यांनी भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता देण्याची सरकारकडे मागणी केली. तसेच इतर व्यवसायांप्रमाणे देहविक्री व्यवसायाला सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या पुण्यात शनिवारी (११ जून) दुपारी १ वाजता बुधवार पेठेतील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप कार्यक्रमात आल्या होत्या. यावेळी देहविक्री व्यवसायातील महिलांसमोर त्या बोलत होत्या.
अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी सरकारला असंच सांगेन की जसा इतर व्यवसायांना सन्मान असतो, त्याप्रमाणे देहविक्री व्यवसायाला देखील आदर मिळाला पाहिजे. त्याला एक व्यवसाय म्हणून स्विकारलं पाहिजे. जर्मनीसारख्या देशांमध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांचं आदरणीय स्थान आहे. देहविक्री व्यवसाय करणारे या देशांमध्ये कर देखील भरतात. तेच स्थान आपण सर्वजण एकत्र आलो तर भारतात देखील मिळू शकतं. मी या निर्णयाच्या पाठीशी आहे.”
“तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे कितीही घाई असेल तर देहविक्री व्यवसायातील महिलांनी आपली वैद्यकीय तपासणी करावी. तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्यात काही आजार होण्याचा धोका असतो, तो धोका ओळखा. तसेच नियमितपणे आपली तपासणी करून घ्या. त्यासाठी तुमच्यामागे भारतीय जनता पक्ष उभा आहे,” असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.
“आपल्या मुलांसाठी बचत करायला विसरू नका”
अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, “आपल्या मुलींना शिकवा. आपल्या मुलांसाठी बचत करा. त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. वृद्धापकाळात वृद्धाश्रमाची गरज असते. त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करू. मात्र, तुम्ही देखील आपल्या मुलांसाठी बचत करायला विसरू नका.”
“बुधवार पेठेतील तुमच्या भागात हवं तिथं योगा क्लासेस उपलब्ध करून देऊ”
“योगा करणं सर्वांनी गरजेचं आहे. तुम्ही सर्वजण तयार असाल तर मी तुमच्यासाठी चांगले प्रशिक्षक आणून तुमचे योगा सेशन घेईन. तुम्ही हा योगा घरी केला तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तंदुरुस्त राहाल. आम्ही बुधवार पेठेतील तुमच्या भागात हवं तिथं योगा क्लासेस उपलब्ध करून देऊ,” असंही अमृता फडणवीसांनी नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!