जामखेड न्युज – – – –
अनेक मोठे निर्णय घेऊन ते अंमलात आणले गेले यामुळे अहिल्यादेवी विषयी लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. यामुळेच दरवर्षी ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहाने साजरी केली जाते. आज त्यांची २९७ वी जयंती आहे. जयंतीनिमित्त चौंडीत दि. ३१ रोजी दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार रोहित पवारांनी जामखेड न्युजशी बोलताना केले.
त्याच्या जयंती निमीत्त त्यांच्या विषयीचा थोडक्यात माहिती…
Advertisement
करोना काळात थोरा मोठ्यांच्या जयंत्या या जल्लोषात साजऱ्या होत नसल्या तरी सोशल मिडीया वर आपण जयंतीच्या शुभेच्छा देतो. आज जाणून घ्या पती निधनानंतर त्यांच्या मिळकतीवर पहिला हक्क पत्नीचा असेल असे जाहीर करुन हा निर्णय प्रांतात अंमलात आणणाऱ्या तसेच विधवेला मुल दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या. मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वत:च्या घरापासून सुधारणेला सुरूवात करणाऱ्या. हुंडा बंदी, विनाकारण वृक्षतोड करण्याला तसेच जंगलतोडीला बंदी घालण्यासारखे मोठ मोठे निर्णय घेणाऱ्या आणि अंमलात आणणाऱ्या आहिल्यादेवी यांची २९६ वी जयंती आहे. त्यांच्या जयंती निमीत्त त्यांच्या विषयीचा थोडक्यात आढावा…
अनेक मोठे निर्णय घेऊन ते अंमलात आणले गेले यामुळे अहिल्यादेवी विषयी लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. यामुळेच दरवर्षी ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहाने साजरी केली जाते.पडदा पद्धतीला विरोध आणि दररोज दरबार भरवून जनतेचे म्हणणे ऐकून तातडीने प्रश्न सोडवणे ही अहिल्यादेवींच्या कामाची खास पद्धत होती. अशा या अहिल्यादेवीचा ३१ मे १७२५ चौंडी गाव, जामखेड तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र येथे जन्म झाला.
अहिल्यादेवींचे वडील माणकोजी शिंदे मूळचे बीड जिल्ह्याचे होते. ते चौंडी गावाचे पाटील होते. वडील प्रगत विचारांचे असल्यामुळे अहिल्यादेवींना घरी लिहायला-वाचायला शिकवण्यात आले होते. पेशव्यांचे सरदार आणि माळवा प्रांताचे जहागीरदार मल्हारराव होळकर पुण्याला जात असताना विश्रांतीसाठी एका ठिकाणी थांबले. तिथे जवळच असलेल्या मंदिरात आठ वर्षांच्या अहिल्यादेवी मनोभावे पूजा करताना पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले. मल्हाररावांनी अहिल्यादेवींच्या वडिलांशी चर्चा केली. काही दिवसांनी अहिल्यादेवी आणि मल्हाररावांचे पुत्र खंडेराव होळकर यांचा विवाह झाला.
अहिल्यादेवीचे लग्न १७३३ मध्ये झाले आणि त्यांना मुलगा १७४५ मध्ये झाला. या मुलाला मालेराव होळकर या नावाने सगळे ओळखू लागले. खंडेरावांचे १९५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत तोफगोळा लागून निधन झाले. पण पतीसोबत सती जाण्यास अहिल्याबाईंनी नकार दिला. त्यांनी सतीप्रथेला विरोध केला. मल्हाररावांनी अहिल्याबाईंना पाठिंबा दिला. खंडेरावांच्या पश्चात मल्हाररावांनी अहिल्याबाईंना राजकारणात सक्रीय केले. त्यांची हुशारी आणि शौर्य पाहून त्यांना युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. पण मुलापाठोपाठ बारा वर्षांनंतर मल्हाररावांचे १७६६ मध्ये निधन झाले.
पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होता त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. यानंतर जनतेचं कल्याण करत करत भारतभरामध्ये अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट त्यांनी बांधले, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अनेक देवळांच्या आश्रयदात्या बनल्या. अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळा बांधून त्यांनी भाविकांची गैरसोय टाळली. मंदिरांसाठी काम करूनही त्यांनी धर्माच्या नावाखाली असलेल्या अनेक रूढ, अनिष्ट प्रथांना छेद दिला. अशा या इतिहास घडवणाऱ्या देवी अहिल्यादेवीचे १३ ऑगस्ट १७९५ मध्ये निधन झाले. त्यांच्या जयंती निमीत्त त्यांना विनम्र अभिवादन.