जामखेड न्युज – – – –
बीड शहरातील प्रसिद्ध व्यापारी टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून कल्याण बीड मार्गावरील धामणगाव ता. आष्टी जि. बीड घाटात क्रेटा गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली अपघात बुधवार दि. ११ रोजी सायंकाळी नऊ ते साडेनऊ च्या आसपास झाला या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनिल टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतिश टेकवाणी सह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला टेकवाणी कुटुंब बीड शहरातील प्रसिद्ध व्यापारी कुटुंब आहे.
एकाच कुटुंबातील चौघांचा झालेला अपघाती मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.