जामखेड न्युज – – – –
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन – 2022 च्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना उच्च शिक्षण खात्यामार्फत करण्यात आली असून या समितीच्या सदस्यपदी शिरुर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . के .सी मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यातील भूमीपुत्राचा देशपातळीवर नावलौकिक प्राप्त झाला आहे.
जामखेड तालुक्यातील पिंपळगाव (आळवा) येथील रहिवाशी असणारे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांच्या रूपाने तालुक्याचे नावलौकिक झाले, त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध पदावर व राज्यातील व देशातील विविध संशोधन संस्थामध्ये काम व संस्थांना सहकार्य केलेले आहे. राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा डॉ. सी. व्ही. रमण पुरस्कार मिळालेला आहे.
मोहिते यानी सांगितले की ही समिती शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी,
अहवालातील शिफारशींची निकड, प्रभावी अंमलबजावणीची सुलभता , गुंतवणूक आणि निधीची गरज , कार्यवाहीमधील प्राधान्य या सर्व घटकांचा अभ्यास करुन अहवाल तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी, अहवालातील शिफारशींचे, त्यांची निकड, प्रभावी अंमलबजावणीची सुलभता , गुंतवणूक आणि निधीची गरज , कार्यवाहीमधील प्राधान्य या सर्व घटकांचा अभ्यास करुन अहवाल तयार करण्यासाठी सदर समिती स्थापन करण्यात आली आहे सदर समिती मधे विविध विद्यापीठचे कुलगुरू व शिक्षणतज्ञ यांची सदस्य म्हणून शासनाने नेमणूक केली आहे.
मोहिते यांच्या निवडी बद्दल दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. उद्धवराव (बापू) देशमुख, उपाध्यक्ष श्री. अरुण (काका) चिंतामणी, सचिव श्री.शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार श्री.राजेश मोरे जामखेड महाविद्यालय, जामखेडचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुनिल नरके, प्रा. मधुकर राळेभात, प्रा. बाळासाहेब पवार, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशींग, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, प्रत्रकार श्री. सुदान वराट सर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.