शुक्रवारी ग्रामीण आरोग्य प्रकल्प येथे भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन, गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा – डॉ. संजय वाघ

0
235
जामखेड प्रतिनिधी 
आज़ादी का अमृत महोत्सव राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य विभाग व सार्वजनिक विभाग महाराष्ट्र शासन आयेजित भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जामखेड येथिल ग्रामीण आरोग्य प्रकल्प (आरोळे हॉस्पिटल) याठिकाणी शुक्रवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते २ वा यादरम्यान हा भव्य आरोग्य मेळावा (शिबीर) होणार आहे. या आरोग्य मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांसाठी सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अधिक्षक डॉ. संजय वाघ यांनी केले आहे.
   या मेळाव्यासाठी खा. सुजय विखे, आ. रोहित पवार, कर्जत – जामखेड एकात्मिक विकास संस्था, रत्नदीप होमिओपॅथिक मेडीकल, नर्सिग, फार्मसी कॉलेज रत्नापुर, प्रजापती ब्रम्हकुमारी, जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन-दिल्ली (जामखेड ) जामखेड तालुका डॉक्टर्स & केमिस्ट असोसिएशन, सर्व वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकिय अधिकारी व  कर्मचारी, तालुका सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नगरपरिषद, पंचायत समिती  महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत इंदिरा हॉस्पिटल, जामखेड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
 तरी सदर आरोग्य मेळाव्यात सर्वांनी सहभागी होऊन आरोग्य संबंधीत योजनांचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.  या शिबीरासाठी येताना पासपोर्ट साईज दोन फोटो , केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड , आधार कार्ड , मतदान ओळखपत्र व मुळ कागदपत्र व सोबत झेरॉक्स प्रत्येकी सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. या शिबीरात सर्व रोग तपासणी, निदान विशेष तज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार मोफत केले जाणार आहेत. तसेच हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदूचे आजार, फुफ्फुसाचे आजार, कॅन्सर, गरोदर माता व स्त्रीरोग तपासणी, लहान मुलांचे आजार, किडणी आजार, मोतिबिंदु, त्वचारोग, गुप्तरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, एच.आय.व्ही. तपासणी, क्षयरोग, दंतरोग, कुष्ठरोग व इत्यादी सर्व आजारांवर मोफत रक्त, लघवी, एक्स-रे, ई.सी.जी. तपासणी गरजु रुग्णांना आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया व उपचार महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत दिले जातील. या बरोबरच आयुर्वेद विभागा अंतर्गत मोफत तपासणी तसेच निरोगी जीवनशैली विषयी आहार, योगा इतर सल्ला आणि मार्गदर्शन किशोर वयातील मुला – मुलींसाठी, कुमार अवस्थेतील बालकांच्या समस्या या विषयी सल्ला व मागदर्शन, विशेष बाब अंतर्गत या आरोग्य मेळाव्यामध्ये रक्तदान शिबीर तसेच नेत्रदान, अवयवदान, देहदान संबंधी स्वयं इच्छापत्र भरून घेतले जाणार आहे. त्यासाठी पासपोर्ट २ फोटो आणावेत. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
    जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदिप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. संजय घोगरे , जिल्हा रुग्णालय अहमदनगर तहसिलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी तथा अध्यक्ष आरोग्य मेळावा प्रकाश पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बोराडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ . संजय वाघ यांच्या वतीने या भव्य अशा आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here