साकत सेवा संस्थेच्या चेअरमनपदी कैलास वराट तर व्हा.चेअरमनपदी दादा नेमाने यांची बिनविरोध निवड

0
229
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – – 
 तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असणाऱ्या साकत सेवा संस्थेची निवडणुक बिनविरोध करण्यात राजकीयदृष्टय़ा एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या नेतेमंडळींना यश मिळाले होते. आज चेअरमनपदी कैलास वराट, तर व्हा.चेअरमनपदी दादा रामभाऊ नेमाने यांची आज बिनविरोध निवड झाली. निवड जाहीर होताच गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांनी तर सहायक म्हणून दादासाहेब मेंढकर यांनी काम पाहिले
    साकत सेवा संस्था बिनविरोध करण्यात पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवानराव मुरुमकर, माजी चेअरमन प्रा अरूण वराट, हनुमंत वराट, सुरेश वराट, सरपंच हनुमंत पाटील, माजी सरपंच कांतीलाल वराट, सदाशिव वराट, हरीभाऊ मुरुमकर, राजेंद्र वराट, नागेश वराट, विठ्ठल वराट, शहादेव वराट, जालिंदर नेमाने, विशाल नेमाने, भरत लहाने, अविन लहाने, महादेव वराट, प्रा भागवत वराट, महादेव वराट सर, राजाभाऊ तुकाराम वराट, बिभिषण वराट, नाशिक लहाने, कृष्णा पुलवळे, सचिन नेमाने, विजय घोलप, अजय नेमाने, अभिमान घोलप, दादासाहेब वराट, राजू मुरलीधर वराट, विशाल नेमाने, माणिक वराट, कैलास वराट, राम जावळे, विष्णु लहाने, भाऊसाहेब लहाने, युवराज मुरुमकर, पोपट मुरुमकर, बाळासाहेब सानप, मोहन अडसुळ, नागनाथ अडसुळ, रमेश अडसुळ यांची बिनविरोध साठी विशेष प्रयत्न केले होते.
   साकत सेवा संस्थेसाठी एकुण ३९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते यातील आज २६ जणांनी माघार घेतली त्यामुळे फक्त १३ उमेदवार शिल्लक राहिले हे सर्व बिनविरोध झाले ते पुढीलप्रमाणे होते.
सर्वसधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी
वराट महादेव जिजाबा, नेमाने दादा रामभाऊ, वराट गणेश विठठल, वराट कैलास देवराव, लहाने नानासाहेब मारुती,
वराट हनुमंत माणिक, मुरुमकर विनोद राम, घोलप दिलीप रावसाहेब
महिला राखीव प्रतिनिधी
वराट जयश्री सुरेश, वराट इंदुबाई भागवत
इतर मागास प्रवर्ग
 वराट पोपट आश्रु,
भटक्या विमुक्त जाती/जमाती
 सानप पांडुरंग पंडीत
अनुसुचित जाती/जमाती
संस्था
 पुलवळे भाउसाहेब काशिनाथ
      अशा पद्धतीने १३ संचालक बिनविरोध ठरले होते.
         जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वराट यांनी जामखेड न्युजशी बोलताना म्हणाले की, गावाच्या विकासासाठी व शेतकरी हितासाठी आम्ही सर्वांनी एकत्र बसून सोसायटी बिनविरोध करून इतिहास घडविला आमदार रोहित  (दादा) पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध पार पडली तसेच जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांचेही सहकार्य लाभले होते आज चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. चेअरमन व व्हा.चेअरमन तसेच संचालक मंडळाने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत असे आवाहन केले.
 चेअरमन कैलास वराट यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांत माजी चेअरमन प्रा. अरुण वराट यांनी साकत सेवा संस्थेचा स्वच्छ व पारदर्शक सभासद हिताचा कारभार केला त्यावर विश्वास ठेवून हि निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले तसाच कारभार पुढील काळात करणार आहोत
    देविदास घोडेचोर सहाय्यक निबंधक यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की, चेअरमन व व्हा.चेअरमन तसेच संचालक मंडळाने शेतकरी सभासदांना कर्ज वाटप करताना दुजाभाव करू नये. कोणालाही वंचित ठेवू नये. संस्थेच्या जागेत गाळे बांधावेत नवनवीन उपक्रम राबवावेत. शेतकरी हितासाठी निर्णय घ्यावेत. असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here