जामखेड न्युज – – – –
शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावरील हल्ल्यापूर्वी एसटी कामगारांचे वकील अॅड गुणरत्न सदार्वेत यांनी व्हॉट्सअॅपवर नागपुरातील व्यक्तीसोबत दोन वेळा संवाद साधल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर हा नागपूकर कोण? याची चर्चा सुरू झाली. मुंबई पोलिसांनी सदार्वेत यांनी व्हॉट्सअॅप कॉल केलेल्या नागपूकराचे लोकेशन शोधले. त्याची माहिती काढली. तो क्रमांक संदीप गोडबोले यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावरील हल्लाप्रकरणात नाव आलेल्या ‘त्या’ नागपूरकराला मुंबई पोलिसांनी बुधवारी अटक केली. संदीप गोडबोले (रा. जलालखेडा),असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव आहे.
शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावरील हल्ल्यापूर्वी एसटी कामगारांचे वकील अॅड गुणरत्न सदार्वेत यांनी व्हॉट्सअॅपवर नागपुरातील व्यक्तीसोबत दोन वेळा संवाद साधल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर हा नागपूकर कोण? याची चर्चा सुरू झाली. मुंबई पोलिसांनी सदार्वेत यांनी व्हॉट्सअॅप कॉल केलेल्या नागपूकराचे लोकेशन शोधले. त्याची माहिती काढली. तो क्रमांक संदीप गोडबोले यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांचे पथक नागपुरात आले. मुंबई पोलिसांनी गणेशपेठ पोलिसांच्या मदतील गोडबोले यांना अटक केली. मुंबई पोलिसांचे हे पथक गोडबोले यांना घेऊन बुधवारी रात्री मुंबईकडे रवाना झाले.