जामखेड प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्सवात समस्त भीमसैनिक आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीने जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना कोरोणा योद्धा पुरस्कार देऊन नागरी सत्कार करून सन्मानित करण्यात आले
यावेळी आ.रोहितदादा पवार यांनी संजय कोठारी यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमात कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉक्टर शोभा आरोळे, सुलताना मॅडम जामखेड येथील डॉ. सौ अर्चना झगडे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे आणि अनेक डॉक्टरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
कोरोना काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केलेले उल्लेखनीय कार्य व स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता समाजाच्या आरोग्य सेवेचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले आपण अनेक वर्षापासून स्व:ता च्या रुग्णवाहिकेत अपघातग्रस्तांना मदत करून त्यांचे प्राण वाचवले आहे आणि जामखेड तालुका, पाटोदा तालुका आणि कर्जत तालुका या रोडला कुठेही अपघात झाल्यास आपण आहोरात्र जाऊन रुग्णांचे प्राण वाचवता तसेच कोरोना काळामध्ये आपण अन्नदान, मुक्या प्राण्यांना हिरवा चारा, पाण्याची व्यवस्था आणि मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना भाकरी ची व्यवस्था केली, अनेक गरजूंना किराणा दिला, या काळामध्ये आपण रक्तदान शिबिरे घेतली तसेच सर्व रोग निदान शिबीर ,पोलीस कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करून त्यांना औषधे दिले तसेच कोरोणा काळामध्ये परराज्यातील पायी जाणाऱ्या लोकांना जेवणाची व्यवस्था केली असे अनेक उल्लेखनीय काम आपण करत आहात याबद्दल आपला सार्वजनिक भीम जयंती महोत्सव समिती व जामखेड करांच्या वतीने नागरी सत्कार करून कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला यावेळी आमदार रोहितदादा पवार , डॉ शोभा आरोळे,राजेंद्रतात्या सदाफुले ,मुकुंद घायतडक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, सुनील जावळे सर, प्रा. लक्ष्मण ढेपे प्रा. मधुकर आभार राळेभात, अमित चिंतामणी ,दिगंबर चव्हाण,प्रकाश सदाफुले, गोकुळ गायकवाड सर, विकीभाऊ सदाफुले ,विकी घायतडक राहुल अहिरे सर,आदी उपस्थित होते