जामखेड प्रतिनिधी
शिक्षक बॅंकेने या पाच वर्षांत अनेक सभासद हिताचे निर्णय घेऊन महाराष्ट्रात चांगला नावलौकिक मिळविला आहे. एक अग्रगन्य बॅक म्हणून उदयास आली आहे पुर्वीच्या काळी सहकारी बँक शिक्षक बॅंकेला कॅश क्रेडिट पुरवत असे त्यामुळे शिक्षक बॅक व सहकारी बॅक यांचेच जुनेच नाते आहे. आता शिक्षक बॅक स्वभांडवली बॅक झाली आहे असे मत जिल्हा सहकारी बँकेचे नुतन बिनविरोध संचालक अमोल राळेभात यांची सांगितले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, गुरुमाऊली मंडळ व शिक्षक बँक जामखेड यांच्या वतीने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदी अमोल जगन्नाथ राळेभात यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकारमहर्षी जगन्नाथ (तात्याा) राळेभात, तर प्रमुख पाहुणे म्हणून
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मकरंद काशिद,
शिरूरचे उपसरपंच विठ्ठल चव्हाण, शिक्षक बॅॅंकेच्या संचालक सीमा निकम, शिक्षक नेेते राम निकम, जिल्हा
शिक्षक नेते नारायण लहाने, जिल्हा नेते शिवाजी हजारे, सरचिटणीस वैजीनाथ गीते, आदर्श शिक्षिका रत्नमाला खुटे, तालुकाध्यक्ष गुरूमाऊली मंडळ हनुमंत निंंबाळकर अध्यक्ष शिक्षक परिषद राजेंद्र मोहळकर, कार्याध्यक्ष शिक्षक परिषद प्रवीण पवार, कोषाध्यक्ष नागनाथ कोंडकेवाड, फिरोज खान पठाण, राजेंद्र हजारे, संजय उंडे , विजय रेणुके, अभिमान घोडेस्वार, मनोज दळवी, राजेश्वर दुंपलवाड, शिवाजी घोडके ,नितेश महारनवर, राजू कर्डिलें, अतुल कोल्हे, दीपक तांबे, विकास हजारे आदी शिक्षक उपस्थित होते.
यावेळी अमोल राळेभात म्हणाले की, शिक्षक बँक व सहकारी बँक यांचे खूप जुने नाते आहे ,पूर्वीच्या काळी शिक्षक बँकेस कॅश क्रेडिट सहकारी बँक पुरवत असे यातूनच प्रगती करून शिक्षक बँक स्वभांडवली झाली या पंचवार्षिक काळात शिक्षक बँकेने खूप शिक्षक हिताच्या धोरणांचा अवलंब केला आहे यामुळे ती महाराष्ट्रात अग्रगण्य बँक म्हणून सम्बोदली जाते तसेच शेतकऱ्याची मुले शिक्षक म्हणून नोकरीत आहेत, सहकारी बँक शेतकऱयांच्या अडीअडचणी सोडवते तर शिक्षक बँक त्यांच्या मुलांच्या अड्चणीस मदत करते, यापुढेही जगन्नाथ राळेभात यांचे प्रमाणेच सर्व शिक्षकांना सहकार्य केले जाईल असे आश्वासन अमोल राळेभात यांनी दिले, राम निकम यांनी शिक्षक बँकेच्या कामकाजाची व विविध शिक्षक हिताच्या योजनांची माहिती दिली.
नारायण लहाने यांनी शिक्षकाचे विविध प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी आपले सहकार्य गरजेचे आहे असे मत मांडले, शिवाजी हजारे यांनी जगन्नाथ तात्या राळेभात यांचे प्रमाणे अमोल राळेभात यांनीही चांगले काम करावे व बँकेचा नावलौकिक वाढवावा असे मत व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम निकम यांनी केले सूत्रसंचालन विजय रेणुके यांनी केले तर आभार सीमा निकम यांनी मानले.