जामखेड न्युज – – –
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,’ हा उद्धाराचा राजमार्गच बाबासाहेबांनी संपूर्ण भारतीयांना दिला. म. फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक, विषमतानिर्मूलनाच्या कार्याचा वारसा डॉ. आंबेडकरांनी पुढे चालविला आणि त्यांना गुरुस्थानी मानून सामाजिक क्रांतीचे कार्य अधिक सक्षम बनविले. शोषितवर्गाचे शिक्षण झाले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. देशातील विषमतेला नष्ट करणारा एकमेव उपाय म्हणजे शिक्षण होय, असे त्यांचे मत होते. थोरांचे विचार डोक्यात आणा व त्यांचे अनुकरण करावे. असे आवाहन शिवव्याख्याते गणेश शिंदे यांनी केले
जामखेड तालुक्यातील बावी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीमजयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती एकत्र साजरी करत सामाजिक समतेचा संदेश दिला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योगपती संतोषजी पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, शिवव्याख्याते गणेश शिंदे. सुंदरदास बिरंगळ, उद्योजक हेमंत बिरंगळ, सरपंच निलेश पवार, युवा सेना प्रमुख सावता हजारे, राहुल कवादे, गणेश पवार, दिपक पवार, योगेश पवार, दत्ता साळुंखे, गुलाब जांभळे,
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज” हे नुसतं नाव जरी वाचलं तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. ते फक्त जाणते राजे नव्हते तर, मराठी माणसासाठी ते दैवत आहेत.
महाराजांनी ४०० वर्षांपूर्वी जुलमी मुसलमान राजवटीत पिचलेल्या जनतेची सुटका केली व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य स्थापन केले.
हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी योग्य व्यवस्थापन केलं. त्यांचं नेतृत्व, संघटन कौशल्य, युद्धनीती, गनिमी कावा हे फार उंचीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे उभे आयुष्य हा मोठा विषय आहे. आपण त्यांचे विचार अंगीकारले तर प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.
अध्यक्षस्थानावरून बोलताना संतोष पवार म्हणाले की, ग्रामीण भागातील तरूणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाकडे वळावे यासाठी मी मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तयार आहे. थोर राष्ट्रपुरुषांच्या विचारांचे अनुकरण केल्यास निश्चितच प्रगती होते असेही सांगितले