जामखेड न्युज – – –
आमचा बाबू, भैय्या, लाडला खुपच छान गाडी चालवतो तो एकदम एक्स्पर्ट आहे. असे पालक आपल्या मुलाचे कौतुक करत असतात अनेक मुले शाळा काॅलेज मध्येही गाडी घेऊन जातात पण आता पालकांनी सावध होणे आवश्यक आहे कारण अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास पालकांना तुरूंगात जावे लागणार आहे.
वाहनधारकांनो सावधान! तुम्ही स्वत: किंवा आपल्या चालकाकरवी अथवा कोणा इतर व्यक्तीकरवी आपले वाहन रस्त्यावर आणत असाल तर काळजी घ्या. (1 सप्टेंबर 2019) देशभरात वाहतुकीचे नवे नियम (New Traffic Rules) लागू होत आहेत. केंद्र सरकारने नव्या मोटार वाहतूक कायद्यातील ६३ तरतुदी लागू करण्यासंदर्भात एक अधिसूचना काढली आहे. त्यानुसार देशात वाहतुक कायदा राबवला जाणार आहे. या नव्या नियमांनुसार आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम आणि शिक्षेचा कालावधी बराच मोठा आहे. तसेच, या नियमांची वाहतूक पोलीस (Traffic Police) कठोर अंमलबजावनीही करणार आहेत. त्यामुळे वाहतूक कायदा (Motor Vehicles Act) अथवा वाहतूक नियम (Traffic Rules) भंग होईल असे वर्तन करु नका. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा अशा अनुक्रमे वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृहात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते. जाणून घ्या वाहतुकीचे नवे नियम दंड आणि शिक्षेचा कालावधी.
वाहनधारकांनी जर आपल्या अल्पवयीन मुला-मुलींच्या हाता वाहन दिले आणि त्यांच्याकडून गुन्हा घडला तर त्यास पालकांना दोषी धरण्यात येईल. तसेच या गुन्ह्यापोटी तब्बल 25 हजार रुपये आर्थिक दंड तर, 3 वर्षे तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. विनापरवाना वाहन चालवत वाहतूक नियम भंग केल्यास आता 5 हजार रुपये इतका दंड आकारला जाणार आहे. वेगमर्यादेचा भंग करत वाहन भरधाव वेगाने हाकल्यास 2 हजार रुपये, रस्त्यावरुन जाताना रुग्णवाहिकेला वाट रिकामी न करुन दिल्यास तब्बल 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. दुचाकी वाहन चालवताना जर तीघांनी प्रवास (ट्रिपल सीट) केल्यास दंडाची रक्कम 2000 इतकी असणार आहे. (हेही वाचा, सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द)