बावी ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीचा भगवा झेंडा सरपंचपदी शिवसेनेचे निलेश पवार पाटील तर उपसरपंच पदी अजय मंडलिक यांची बिनविरोध निवड

0
231

जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या बावी ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीचा भगवा झेंडा फडकला असून सरपंचपदी शिवसेनेचे निलेश पवार पाटील तर उपसरपंच पदी अजय मंडलिक यांची बिनविरोध निवड झाली आहे.
    दि. १० रोजी निवडणूक अध्यासी अधिकारी घोडेराव डी. बी व सहाय्यक वैभव साळवे यांनी सकाळी अकरा वाजता सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेतली यावेळी सरपंच पदासाठी निलेश पवार पाटील तर उपसरपंच पदासाठी अजय मंडलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले विहित वेळेत दुसरा अर्ज न आल्याने सरपंच पदी निलेश पवार पाटील यांची तर उपसरपंच पदी अजय मंडलिक यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अध्यासी अधिकारी घोडेराव यांनी सांगितले. सरपंच व उपसरपंच निवडी जाहिर होताच फटाक्यांच्या व ढोलताशांच्या आतषबाजीने गुलालाची उधलण करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
    यावेळी जामखेड न्युजशी बोलताना सरपंच निलेश पवार पाटील म्हणाले की, निवडणूक संपली आता राजकारण संपले आता समाजकारण सुर जनतेने जो मतदानाच्या रूपाने आशिर्वाद दिला आहे. त्याची परतफेड गावाचा सर्वागीण विकास करून करू. शासनाच्या विविध योजना तळागाळातील वंचित व खरोखरचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहचवू गावाच्या विकासाचे ध्येय ठेवूनच ग्रामपंचायत निवडणूकीत उतरलो होतो जनतेला आमचा विश्वास वाटला त्यामुळे सात पैकी सहा जागा जिंकल्या होत्या. निवडणूकीत संपुर्ण गावातील माता, भगिनी, वयोवृद्ध व तरूणांनी भरभरून साथ दिली त्यांची परतफेड विकासकामे करून करणार आहे असे सरपंच निलेश पवार पाटील यांनी सांगितले.
     बावी ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीचा भगवा झेंडा फडकल्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला होता. तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काशिद यांनीही सत्कार केला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here