Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या पोलिसांसाठी महत्त्वाच्या प्रश्नावर आमदार रोहित पवारांनी विधानसभेत वेधलं सरकारचं लक्ष! 

पोलिसांसाठी महत्त्वाच्या प्रश्नावर आमदार रोहित पवारांनी विधानसभेत वेधलं सरकारचं लक्ष! 

0
226
जामखेड न्युज – – – – 
कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहितदादा पवार  यांनी 24तास जनतेच्या सेवेत असणाऱ्या पोलीस बांधवांच्या विविध अडचणी व समस्या समजून घेऊन त्या संदर्भातील प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केले. राज्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी वैयक्तिक कुटुंबाची व घराची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र रस्त्यावर असतात. दिवाळी असो अथवा कोणताही सण, उत्सव ही पोलीस मंडळी कायम जनतेच्या सुरक्षेसाठी तत्परतेने उभी असतात.
                          ADVERTISEMENT
 
पोलीस बांधवांच्या अनेक दुर्लक्षित अडचणी व समस्या आहेत याकडे आमदार रोहितदादांनी पोलिसांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नावर विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून घेतले आणि सरकारनेही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी अधिवेशनात बोलत असताना आमदार रोहितदादा पवार यांनी पोलिसांसाठी असलेल्या कॅशलेस रुग्णालयांच्या संख्येत वाढ करावी, निवृत्तीनंतरही त्यांना आरोग्यसेवा मिळावी, पोलिसांवर येणारा ताण कमी करण्यासाठी त्यांच्या किरकोळ रजेमध्ये वाढ करावी तसेच पोलिसांना राहण्यासाठी प्रशस्त व चांगली निवासस्थाने सरकारतर्फे उपलब्ध करून द्यावी, अशा पोलिसांच्या बाबतीतील विविध अडचणींकडे राज्य सरकारच्या गृह विभागाचे लक्ष वेधले. यावेळी लक्षवेधीला उत्तर देत असताना महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काळात नक्कीच या संदर्भात सकारात्मक पावले उचलली जातील असे बोलून दाखवले.
दरम्यान, पोलिसांच्या घरांच्या आणि इतरही बाबतीत असलेली सध्याची परिस्थिती ही आमदार रोहित पवारांनी बोलताना विषद केली. त्यामुळे पोलिसांसाठीच्या अडचणी या आता राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच सोडवल्या जातील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!