मोहा ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी सारीका डोंगरे तर उपसरपंच पदी स्वाती डोंगरे यांची बिनविरोध निवड

0
203

जामखेड प्रतिनिधी

  तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मोहा ग्रामपंचायत मध्ये सरपंचपदी सारीका शिवाजी डोंगरे यांची तर उपसरपंच पदी स्वाती वामन डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे मोहा ग्रामपंचायत मध्ये महिला राज आले आहे. तसेच सासु सुनाच्या हातात गावकारभार आल्याने तालुक्यात एक चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोहा गावाचा विकास करून चेहरा मोहरा बदलू असे सरपंच व उपसरपंच यांनी सांगितले.
     मोहा ग्रामपंचायत मध्ये शिवाजी डोंगरे व भिमराव कापसे यांच्या नेतृत्वाखाली नऊ पैकी आठ जागा जिंकून विरोधकांना चारीमुंड्या चित केले होते. मागील पंचवार्षिक मध्ये केलेल्या विकास कामांमुळे जनतेने पुन्हा विश्वास टाकत सत्ता सोपवली जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा गावाचा विकास करण्यात येईल असे शिवाजी डोंगरे, भिमराव कापसे व वामन डोंगरे यांनी सांगितले.
     आज सकाळी आकरा वाजता सरपंच पदासाठी सारीका डोंगरे यांनी तर उपसरपंच पदासाठी स्वाती डोंगरे यांनी अर्ज भरले विहित वेळेत दुसरा एकही अर्ज न आल्याने सरपंच पदी सारीका डोंगरे तर उपसरपंच पदी स्वाती डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली असे
 निवडणूक आभासी अधिकारी ए. डी. कुलकर्णी व साहाय्यक जयवंत गदादे यांनी जाहीर केले. निवड जाहीर होताच फटाक्यांच्या व ढोलताशांच्या आतषबाजीने गुलालाची उधलण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here