जामखेड न्युज – – – –
करमाळा जामखेड रस्त्याच्या कडेने सध्या केबल टाळण्यासाठी खोदकाम सुरू आहे ते अगदी रस्त्याच्या लगतच सुरू आहे ते नियमबाह्य अनाधिकृत काम सुरू आहे हे ताबडतोब थांबवावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT 

जामखेड नान्नज रस्त्यालगत अनाधिकृत केबल टाळण्यासाठी अगदी डांबरीच्या शेजारी खोदकाम सुरू आहे. नियमानुसार पंधरा मीटर दूर खोदकाम करून केबल टाकण्याचे काम करावयास हवे होते पण ते अगदी जवळच सुरू आहे यामुळे पावसाळ्यात चिखल होऊन अनेक अपघात होतील त्यामुळे हे काम ताबडतोब थांबवावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी दिला आहे.
रमेश आजबे यांनी म्हटले आहे की, यांची कल्पना वारंवार बांधकाम विभागाला दिली आहे. पण बांधकाम विभाग लक्ष देत नाही म्हणून परिसरात आर्थिक देवाणघेवाण झाली असावी असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे बांधकाम विभागाने ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
पंधरा मिटर अंतरावर परवानगी दिलेली असते. पण केबल टाळण्यासाठी पंधरा मिटर अंतराचा नियम पायदळी तुडवला जात आहे. तसेच बांधकाम विभागाने वारंवार सूचना देऊनही बांधकाम विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. ताबडतोब हे नियमबाह्य चालणारे काम न थांबविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी दिला आहे.