टीईटी बोगस शिक्षक संख्या पहा तुमच्या जिल्ह्यातील आकडा!!!

0
264
जामखेड न्युज – – – 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) अपात्र ठरलेल्या तब्बल सात हजार 880 परीक्षार्थींकडून प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये घेऊन घेऊन त्यांना पात्र ठरविल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. आता याबाबतची जिल्ह्यानिहाय नावे पुढे आली आहेत. यात नगर जिल्ह्यात 149, नाशिकमध्ये 1154 तर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात 395 बोगस शिक्षक असल्याची माहिती पुढे आली आहे.
                       ADVERTISEMENT
2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 592 परीक्षार्थींना पात्र केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल सात हजार 800 परीक्षार्थी हे अपात्र होते. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले आहे.
2019-20 च्या टीईटी परीक्षेतील पहिला पेपर एक लाख 88 हजार 688 उमेदवारांनी दिला होता. त्यातील 10 हजार 487 जणांना पात्र ठरविण्यात आले होते. तर, पेपर दोनसाठी एक लाख 54 हजार 596 जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी सहा हजार 105 जणांना पात्र ठरविण्यात आले होते. हा निकाल 19 जानेवारी 2020 रोजी जाहीर करण्यात आला होता. या पडताळणीत सात हजार 800 विद्यार्थी अपात्र असताना त्यांना पात्र दाखविल्याचे समोर आले आहे.
टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी मंगळवारी दोषारोप पत्र दाखल केलं. आरोपी सुकाराम सुपे, सुखदेव ढेरेसह 15 जणांविरोधात 3,995 पानांचं हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. अजूनही याप्रकरणी दहा ते बारा आरोपींचा शोध सुरु आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती बोगस शिक्षक ?
मुंबई दक्षिण – 40, मुंबई पश्चिम – 63, मुंबई उत्तर – 60, रायगड – 42, ठाणे – 557, पालघर – 176, पुणे -395, अहमदनगर – 149, सोलापूर – 171, नाशिक – 1154, धुळे – 1002, जळगाव – 614, नंदुरबार – 808, कोल्हापूर – 126, सातारा – 58, सांगली – 123, रत्नागिरी – 37, सिंधुदुर्ग – 22, औरंगाबाद – 458, जालना – 114, बीड – 338, परभणी – 163, हिंगोली – 43, अमरावती – 173, बुलढाणा – 340, अकोला – 143, वाशिम – 80, यवतमाळ – 70, नागपूर – 52, भंडारा – 15, गोंदिया – 09, वर्धा – 16, चंद्रपूर – 10, गडचिरोली – 10, लातूर – 157, उस्मानाबाद – 46 , नांदेड – 259.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here