न्यायालयाच्या निकलापूर्वीच एसटी संपकऱ्यांना झटका; आठ आगारात…

0
205
जामखेड न्युज – – – – 
गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर २२ मार्च रोजी महत्त्वाचा निकाल येण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच एसटी कर्मचारी मोठ्याप्रमाणात कामावर हजर राहत असल्याने संपावर ठाम राहणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आठ आगारातील २५०० पैकी १२५० एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर ४५० पैकी २३८ बसेस विविध मार्गांवर धावत आहेत. (Msrtc Workers Strike)
                          ADVERTISEMENT
                     
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या चार महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. पगार वाढ, सातवा वेतन आयोगाची ही चर्चा झाली मात्र विलीनीकरण एकमेव पर्याय संपकरी यांच्याकडून देण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाई सुरू केली. मात्र आता कामावर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याची घोषणा झाल्यानंतर औरंगाबाद विभागातील ५० टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे लाल परीचे चाक पुन्हा फिरायला सुरवात झाली आहे.
संपाचे नेतृत्व करणे, कामावर हजर होण्याची नोटीस पाठवूनही त्याला उत्तर न देणे आदी कारणांमुळे औरंगाबाद विभागातील १०० जणांना बडतर्फ करण्यात आले आहेत. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे जे कामावर हजर नाहीत त्यांना वेतन दिले जात नाही. त्यामुळे गेली चार महिन्यापासून पगार नसल्याने आर्थिक घडी बिघडत चालली असल्याने अनेक कर्मचारी कामावर हजर राहत आहेत. तर अनेकजण आता फक्त न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष देऊन असून, त्यानंतर कामावर जायचं की नाही असे निर्णय घेण्याच त्यांनी ठरवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here