पत्नीच्या आत्महत्येची बातमी कळताच सीआरपीएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या

0
205
जामखेड न्युज – – – 
 गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 113 व्या तुकडीत तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानाने स्वतःच्या रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास समोर आली आहे. चंद्रभूषण ध्यानचंद जगत वय 28 रा.कुकुदीरकेरा जिल्हा बिलासपुर, छत्तीसगड असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव असून चंद्रभूषण हा
केंद्रीय राखीव पोलीस दलात २०१७ साली भरती झाला
होता .याआधी तो छत्तीसगढ मध्ये सेवा देत होता .पाच
महिन्यापूर्वी त्याची धानोरा येथे बदली झाली होती.
सिआरपिएफ 113 बटालियन ई कैम्प येथे तो कार्यरत होता.
आज सकाळी तो कॅम्प मध्येच ड्युटीवर असताना स्वतःच्या
रायफल ने गळयावर गोळी झाडून आत्महत्या केली.
आज सकाळी त्याला त्याच्या पत्नीने गळफास लावून
आत्महत्या केल्याची बातमी कळताच,पत्नीच्या विरहात
त्यानेही रायफलने गोळी मारून आपली जीवनयात्रा
संपविली.
सदर घटनेचा मौका पंचनामा करुण अधिक तपास धानोरा
पोलिस करीत असून जवानाचा मृतदेह शवविच्छेदन
गडचिरोली येथे करून जवानाचा मृतदेह त्याच्या मुळगावी
पाठविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here