शेतकरी कन्येचं मोठं यश; MPSC परीक्षेत मुलींमध्ये राज्यातून प्रथम!

0
240
जामखेड न्युज – – – 
 ध्येय गाठण्यासाठी जिद्द अन चिकाटी असेल, तर यशाला गवसणी घालण्यापासून कोणीचं रोको शकत नाही. असचं काहीसं बीडच्या (Beed) शेतकरी कन्येनं करून दाखवून दिलंय. कोणतेही क्लास न लावताना, सेल्फ स्टडी (Self Study) करत एमपीएससीमध्ये (MPSC) घवघवीत यश संपादन केलंय. विशेष म्हणजे एनटीसीमधून ही शेतकरी कन्या, मुलींमध्ये राज्यातून प्रथम आली आहे. अश्विनी बाळासाहेब धापसे, असं घवघवीस यश संपादन केलेल्या शेतकरी कन्येचं नाव आहे.
बीडच्या धारुर (Dharur) तालुक्यात असणाऱ्या अंजनडोह येथील, अश्विनी धापसे ही सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी असून, वडील बालासाहेब धापसे हे कोरडवाहू शेती व काही काळ पारंपरिक मेंढपाळ करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. जेमतेम आर्थिक परिस्थिती नसतानाही, मुलांनी शिकावं ही त्यांची खुप इच्छा आहे. त्यासाठी ते रात्रीचा दिवस करून मेहनत घेत आहेत.
अश्विनी धापसे हीने 10 वी पर्यंतचे शिक्षण गावातीलच शाळेतचं झाले आहे. तर कोल्हापूर येथून अभियांत्रिकी शिक्षण पुर्ण केले. त्यांनतर औरंगाबाद येथे बंधू योगीनंद यांच्या सोबत राहून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीएससी स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे कोणतेही क्लास न लावता, सेल्फ स्टडी केली. यादरम्यान 2019 ला परीक्षा झालेल्या महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परिक्षेची गुणवत्ता यादी, नुकतीच जाहीर करण्यात आलीय. यामध्ये एनटीसी मुलींमधून अश्विनी धापसे महाराष्ट्र राज्यातून मुलींमध्ये प्रथम आली आहे. यामुळे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे तीचे व कुटुंबाचे स्वप्न साकार होणार आहे.
दरम्यान, धारुर तालुक्यातील अंजनडोह या एका छोट्याशा गावातील मुलीने नेत्रदीपक यश संपादन केल्याने अश्विनीने धारुर तालुक्याची व अंजनडोह या आपल्या गावाची मान उंचावली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर अधिकारी बनू पाहणाऱ्या गावखेड्यातील मुलांमुलींसमोर एक आदर्श निर्माण केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here