Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये चूक – त्या प्रश्नाला मिळणार एक गुण

इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये चूक – त्या प्रश्नाला मिळणार एक गुण

0
288
जामखेड न्युज – – – – 
इंग्रजी विषयाचा पेपर दिलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. काल झालेल्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये 1 गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या एका प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून देण्यात आली आहे.
बारावी बोर्ड परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर होता. या पेपरमध्ये एका प्रश्नात त्रुटी होती. तो चुकीच्या पद्धतीनं विचारण्यात आला होता.
याबाबतच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी बोर्डासमोर सुद्धा मांडल्या होत्या. त्यानंतर बोर्ड अधिकाऱ्यांनी यावर एक बैठक घेतली आहे. या बैठकीत ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 1) A) 5 हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना बोर्डाकडून एक गुण अधिकचा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये बोर्डाकडून चूक झालेल्या आणि विद्यार्थ्यांने सोडवलेल्या एका प्रश्नाचा 1 मार्क विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
हा प्रश्न सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून एक गुण अधिकचा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इंग्रजी पेपर मध्ये बोर्डाकडून चूक झालेल्या आणि विद्यार्थ्यांने सोडवलेल्या एका प्रश्नाचा 1 मार्क विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!