जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेडचे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांची नियुक्ती बीड येथे शिक्षणाधिकारी म्हणून झाल्याने रिक्त झालेल्या गटशिक्षणाधिकारी पदावर जामखेड पंचायत समिती विस्तार अधिकारी असणारे कार्यकुशल अधिकारी कैलास खैरे यांची प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे त्यामुळे अनेक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कैलास खैरे हे सध्या जामखेड पंचायत समिती मध्ये सांख्यिकी विभागात विस्तार अधिकारी पदावर कार्यरत होते. एक कार्यकुशल अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी घरकुल विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल व वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिल्याबद्दल नाशिक विभागात दुसरा क्रमांक पटकावला होता. तसेच सातारा येथे असताना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियानात उत्कृष्ट कामाबद्दल सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यांची कार्यकुशल अधिकारी म्हणून ओळख आहे.
श्री कैलास भास्करराव खैरे विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पंचायत समिती जामखेड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सातारा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी (ऑगस्ट 2013 ते फेब्रुवारी 2019) मार्च 2019 पासून पंचायत समिती जामखेड घरकुल विभागाचा पदभार. सण 2020-21 महाआवास अभियानांतर्गत घरकुल विभागात नाशिक विभागात द्वितीय क्रमांक. पटकावला होता.
कार्यक्षम व कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची गटशिक्षणाधिकारी रिक्त पदावर एका कर्तव्यदक्ष अधिकार्याची निवड केली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी सत्कार केला यावेळी सचिन खैरे, घनश्याम आडाले, पिंटू इंगोले, राजाभाऊ आजबे, संतोष गोरे, शांतीलाल साळुंके यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.









