जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वयाबाबत राज्य शासनाचा मोठा सकारात्मक निर्णय !

0
336
जामखेड न्युज – – – – 
राज्य शासन सेवेत सन 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी यासाठी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता .हा संप राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आला कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या बाबींवर लवकरात लवकर निर्णय घेवू असे आश्वासन राज्य सरकारकडुन देण्यात आले आहेत.
सन 2005 नंतर शासकिय नौकरीत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( NPS /DCPS ) राबविली जात आहे. ही योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसारखा लाभ मिळत नसल्याची बाब समोर आल्याने या पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांकडुन विरोध केला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येणार आहे.
जुनी पेन्शन योजना लागु करणे शक्य
नुकतेच राजस्थान सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( NPS /DCPS ) बंद करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आले आहे .त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासकिय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे शक्य होईल.  जुनी पेन्शन योजना लागु करण्याबाबत दोन महिने कालावधी द्या ,या प्रश्नावर समिती गठित करुन दोन महिन्याच्या आत जुनी पेन्शन योजना लागु करु अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे.
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावे , अशी मागणी कर्मचाऱ्यांकडुन होत असल्याने याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मा. अजितदादा पवार यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here