स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवजयंती साजरी – किल्ले रायगडसाठी ११ हजाराची देणगी 

0
197
जामखेड न्युज – – – – 
रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने छत्रपतींच्या पुतळ्याला पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, राजुरी गावचे शेतकरी सुभाष श्रिपती काळदाते, पांडुरंग आजबे, नायगाव चे प्रगतशील शेतकरी बाबासाहेब रामभाऊ उगले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर जय भवानी जय शिवाजी घोषणा देऊन पेढे वाटप केले.
      आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा करीता छत्रपती श्री शिवराय मोफत अन्नछत्रालय किल्ले श्री रायगड यासाठी मंगेश दादा आजबे यांच्या कडून ११००० हाजार रुपये रोख देण्यात आले. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत. त्यांची जयंती एक दिवसासाठी नाही. महाराज हा विषयच आपल्या रक्तात आहे. पाश्चिमात्य राष्ट्र हे छत्रपतींच्या गनिमी कावा, प्रशासन, मॅनेजमेंट गुरू याचा अभ्यास करतात. आपल्या वेगवेगळ्या संघटना, राजकीय पक्ष यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे संघटन, राज्यकारभार हा विषय अभ्यासला तरी संघटना, पक्ष व संस्था मोठे करायला पुरेसे आहे.
      यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे म्हणाले, छत्रपतींच्या काळात शेतकरी सुखी होता कारण शेतकऱ्यांसाठी राजे होते. “पाणि आडवा पाणी जिरवा” ही संकल्पना राजेंची होती ती आता राबवली जात आहे. जे राजेंचे गुण घेऊन समाजात वावरतात, समाजासाठी काम केले तर बदल हमखास होईल. आपला शेतकरी एकजुट राहीला सुखी समाधानी होईल असे मंगेश आजबे म्हणाले.
     छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील व शहरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here