शिवजयंती व संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त समस्त जामखेड सुवर्णकार बांधवातर्फे भव्य शोभायात्रा

0
286
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – 
    संपुर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त जामखेड सुवर्णकार बांधवातर्फे व माताभगिणीतर्फे टाळ मृदंगाच्या गजरात भव्य प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष व संत नरहरी महाराज यांच्या अभंगांनी परिसर दुमदुमून गेला होता.
  सकाळी पालखी काढण्यात आली. मेन पेठ, जयहिंद चौक बीड रोड, कोर्ट रोड, सोनार गल्ली असा मिरवणूकीचा मार्ग होता यावेळी हभप दिपक महाराज गायकवाड, नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या सह मोठ्या संख्येने सोनार समाजातील महिला – पुरुष सहभागी झाले होते.
    संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीत टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती तर जयहिंद चौकात शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पुजा करत अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here