धावत्या कारने घेतला पेट; कार जळून खाक!!!

0
249
जामखेड न्युज – – – – – 
 धावत्या कार ने पेट घेतल्याने कार संपूर्ण जळून खाक झाली आहे चालकाच्या प्रसंगावधानाणे कोणतीही जीवित हानी झाली नसून केज अंबाजोगाई रस्त्यावर आज सोमवारी सकाळी घटना घडली आहे.
                          ADVERTISEMENT
 
लातूर कडून निघालेली एमएच-४८ एस-२८५२ कार लातूर कडून औरंगाबाच्या दिशेने जात असताना केज तालुक्यातील कुंबेफळ जवळ येताच  धावत्या करणे  अचानक पेट घेतला. हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच गाडी थांबवून आतील सर्वांना खाली उतरविले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जिवीत हानी टळली. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे घटनास्थळी दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here