जामखेड न्युज – – –
लग्न म्हटलं की गडबड गोंधळ आलाच. लग्नाचा दिवस खास बनवण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे प्रयत्न करतात. पण अनेकदा काही ना काही कारणामुळे लग्नात व्यत्यय येतो. कधी डीजे वाजवण्यावरून वाद होतात. तर कधी नवरदेवाने दाखवलेल्या अट्टहासामुळे. परिणामी अनेक लग्न मोडतात. असाच एक प्रकार दिल्लीतून समोर आला आहे. येथे एका बापाने आपल्याच मुलाच्या लग्नात घटस्फोट देण्याची घोषणा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एका परिसरात लग्न समारंभाचा कार्यक्रम सुरू होता. मात्र लग्न सुरू असताना सासऱ्याने थेट आपल्या बायकोला म्हणजेच मुलाच्या आईला घटस्फोट देत असल्याची घोषणा केली. सासऱ्याने केलेल्या या कृत्याचा नवरीला प्रचंड राग आला. आपल्या लग्नाचा दिवस सासऱ्याने खराब केल्याप्रकरणी त्यांनी तिची माफी मागावी अशी तिने इच्छा व्यक्त केली. मात्र नवरदेवाने आपल्याच वडिलांची पाठराखण केली.
मुलाच्या लग्नाच्या दिवशीच बायकोला घटस्फोट द्यायचा हे मुलाच्या वडिलांनी पहिल्यापासूनच ठरवुन ठेवले होते. कारण त्याच्या पत्नीने त्याला आयुष्यात कधीच प्राधान्य दिले नाही. म्हणून त्याने मुलाच्या लग्नापर्यंत वाट पाहिली आणि त्याच दिवशी आपल्या मुलाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण सर्वात वाईट अनुभवात बदलला.
पत्नी नेहमी त्यांच्यापेक्षा नोकरीला जास्त महत्त्व देते. मुलाच्या लग्नाच्या दिवशी, त्याने बायकोला शेवटचे विचारले की ती तिची नोकरी आणि तिचा नवरा यापैकी कोणाची निवड करेल. त्यावेळी तिने नोकरी निवडली. त्यानंतर वडिलांनी सर्वांसमोर घटस्फोटाची घोषणा केली.
सासऱ्याच्या या कृत्याने नवरी मुलगी नाराज झाली. याबाबत त्यांनी रेडिटवर आपले मत मांडले तेव्हा सर्वांनी नववधूला पाठिंबा दिला. प्रत्येकाचा असा विश्वास आहे की त्यांना त्यांच्या मुलाच्या लग्नाचा दिवस त्यांच्या स्वतःच्या कारणांसाठी खराब करण्याचा अधिकार नाही. मुलगा आणि सुनेच्या आनंदाच्या दिवशी त्यांनी चुकीचा निर्णय जाहिर केला आहे. दरम्यान, घटस्फोटानंतर दोघेही पुन्हा एकमेकांना डेट करू लागले. त्यामुळे नवरी मुलगीचा राग अनावर झाला आहे.




