जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेड तालुक्यातील हळगावचा कारखाना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर ऊस आसतानाही ऊस तोडण्यासाठी कारखाना मजूर पाठवत नाहीत. जवळा, हळगाव, मातेवाडी परिसरातील ऊसतोड करण्यासाठी कामगार मिळण्यासाठी होणारे हाल पाहून या परिस्थितीवर काही ना काही मार्ग निघाला पाहिजे या भावनेतून श्रीराम साखर कारखाना हळगाव या ठिकाणी जाऊन जवळा येथील कार्यकुशल सरपंच प्रशांत शिंदे यांनी हळगाव येथील श्रीराम साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या वेळी शेतकऱ्यांच्या विविध अडचणीवर कारखान्याच्या अधिकाऱ्यां बरोबर खडाजंगी झाली. गावाच्या शेजारी कारखाना असून, वाहतूक ५ किलोमीटर पेक्षा कमी असताना ,पुरेशा ऊस तोड टोळ्या टाकत नाहीत तसेच बैल गाड्या (ढम्पिंग गाड्या) अनामत न घेता चालू कराव्यात दि. ५ फेब्रुवारी पर्यंत पुरेशा टोळ्या उपलब्ध नाही केल्या तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला यावेळी देण्यात आला. यावेळी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



