डिझेल गाडी सीएनजी-एलपीजी करता येणार!!!

0
281
जामखेड न्युज – – – – – – 
चारचाकी डिझेल वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. वाहनांच्या इंजिन नियमांसंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महत्त्वाची अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार आता डिझेल इंजिन असलेल्या वाहनांचे रुपांतर CNG किंवा LPG इंजिनमध्ये करता येणार आहे. 27 जानेवारी 2022 च्या मसुदा अधिसूचनेद्वारे, CNG आणि LPG किटची रेट्रो फिटिंग करण्यास तसेच डिझेल इंजिन ऐवजी CNG/LPG इंजिन बसवण्याची परवानगी देण्याचा मांडण्यात आला आहे. हा नियम 3.5 टनांपेक्षा लहान BS-VI वाहनांना लागू होणार आहे.
मसुदा अधिसूचना जाहीर
सध्या BS-IV उत्सर्जन नियमांनुसार मोटार वाहनांमध्ये CNG आणि LPG किटचे रेट्रो फिटमेंट करता येत आहे. ही अधिसूचना रेट्रो फिटमेंटसाठी प्रकार मंजुरी आवश्यकता नमूद करते. CNG हे पर्यावरणपूरक इंधन आहे आणि पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या तुलनेत CNG कमी प्रदुषण करते. त्यामुळे सर्व घटकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 30 दिवसांच्या आत संबंधित घटकांकडून यासंदर्भात अहवाल मागवण्यात आला आहे.
पर्यावरणपूरक इंधन
केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी हे पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील असतात. याआधीही त्यांनी यासंदर्भात काही पावले उचलली आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात जैविक इंधनाचे उत्पादन वाढवण्यावर केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी भर दिला आहे.
गडकरी काय म्हणाले होते?
नितिन गडकरी यांनी यासंदर्भात याची सुरूवात स्वत:पासूनच करत आपल्या ट्रॅक्टरला सीएनजीमध्ये रुपांतरित केले आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूसंदर्भात देशाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आपल्याला सोयाबीन, गहू, धान्य, कापूस इत्यादी पीकांच्याद्वारे बायो-सीएनजी आणि बायो-एनएनजी सारख्या जैविक इंधनाच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीव्यतिरिक्त इतर उत्पन्न मिळेल, असेही गडकरी म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here