Monday, March 30, 2026
Home ताज्या बातम्या आमदार रोहित पवारांच्या हस्ते 80 हजार विद्यार्थ्यांना वेलकम गिप्ट

आमदार रोहित पवारांच्या हस्ते 80 हजार विद्यार्थ्यांना वेलकम गिप्ट

0
277

जामखेड प्रतिनिधी

जामखेड न्युज – – – – 

 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे नंतर शाळा हळु हळु सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कर्जत व जामखेड येथील विद्यार्थी शाळेत येत असल्याने अंगणवाडी पासून ते दहावी पर्यंत च्या 80 हजार विद्यार्थ्यांना वेलकम गिप्ट चे वाटप करण्यात आले आहे. या बाबत ची नुकतीच माहिती आ. रोहित पवार यांनी नागेश व कन्या विद्यालयातील स्वच्छतागृह, पेयजल व हात धुण्याचे स्थानक सुविधांचा भुमीपुजन समारंभावेळी बोलत होते.

कर्जत जामखेड चे आ. रोहित पवार नुकतेच आज जामखेड दैऱ्यावर होते त्यांनी शहरातील विविध ठिकाणी सुरू आसलेल्या विकास कामांची पहाणी केली. यानंतर सकाळी १० वाजता नागेश विद्यालय या ठिकाणी त्यांच्या हस्ते स्वच्छतागृह, पेयजल व हात धुण्याचे स्थानक या अद्ययावत सुविधांचा भुमीपुजन समारंभ संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, सभापती राजश्री ताई मोरे, सुर्यकांत मोरे, राजेंद्र कोठारी, सावळेश्वर ग्रृप चे संचालक रमेश आजबे, नगरसेवक अमित जाधव. दिगंबर चव्हाण. पवन राळेभात. प्रा लक्ष्मण ढेपे, मोहन पवार, इस्माईल सय्यद, अमोल गिरमे, कंडल राळेभात राजु गोरे, उमर कुरेशी, इम्रान कुरेशी नागेश विद्यालय प्राचार्य श्री मडके बि के ,मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी, उपमुख्याध्यापक तांबे पी एल, पर्यवेक्षक साळवे डी एन पर्यवेक्षक प्रकाश सोनवणे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जामखेड न्युजशी बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की अनेक नामांकित कंपन्या सामाजिक काम करत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत केली जात आहे. कर्जत जामखेड मधिल विद्यार्थींनी देखील मला शाळेतील अनेक असुविधा बाबत अडचणी सांगितल्या होत्या. या अडचणी सोडवण्यासाठी तुमचा भाऊ म्हणून मी कटिबद्ध आहे. रयत संस्थेच्या माध्यमातून कर्जत व जामखेड येथील स्वच्छतागृह व पिण्याच्या फील्टर पाण्यासाठी या वर्षात तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. जगातील एका शाळेला बोलने झाले असुन प्रत्येक शाळेत लवकरच डीजीटल लॉब तयार करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या ट्रेनिंग साठी जिल्हा नियोजन नीधीच्या माध्यमातून २ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या नंतर नागेश विद्यालय व कन्या विद्यालयातील विद्यार्थींनी आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे मास्क, सिनेटायझर व कंपास बॉक्स वाटप करण्यात आले. या नंतर शाळेतील स्वच्छतागृह, पेयजल व हात धुण्याचे स्थानक सुविधांचा भुमीपुजन व विद्यालयातील बॉटनिकल गार्डन उद्घाटन
समारंभ आ. रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!