जामखेड न्युज – – – –
आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आल्याने नितेश राणे यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली असून त्यांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार येत्या दहा दिवसांमध्ये जिल्हा न्यायालयासमोर शरण यावे लागणार आहे आणि त्यानंतर त्यांना रीतसर जामीनासाठी अर्ज करता येणार असलेच असले येणार आहे
नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन यापूर्वीच जिल्हा आणि उच्च न्यायालयाने फेटाळला होता त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आज सर्वोच्च न्यायालयात राणे यांच्याकडून ज्येष्ठ वकील रोहतगी यांनी त्यांची बाजू मांडली तर सरकारी पक्षाच्या वतीने प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली अभिषेक मनु सिंघवी यांनी आपली बाजू मांडताना नितेश राणे यांच्यावर राजकीय तसेच इतरही गंभीर गुन्हे दाखल आहेत या प्रकरणांमध्ये पैशाची देवाण-घेवाण झाली का किंवा हा एक षड्यंत्राचा मोठा भाग आहे का यासाठी पोलिस चौकशीसाठी त्यांना अटक करणे गरजेचे आहे अशी बाजू मांडली सर्वोच्च न्यायालयाने अभिषेक मनु सिंघवी यांची बाजू मान्य करत नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
मात्र याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की पुढील दहा दिवसांमध्ये नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात शरण यावे तो पर्यंत त्यांना अटक करण्यात येऊ नये. जिल्हा न्यायालयात शरण(सरेंडर) झाल्यानंतर त्याठिकाणी ते रीतसर जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करू शकतात असे सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना स्पष्ट केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिक प्रतिस्पर्धी कार्यकर्ते संतोष परब यांना धमकावणे हल्ला करणे अशी घटना घडली होती. हा हल्ला प्रकरणात त्या संदर्भात त्यांना अटक करण्याची तयारी पोलिसांनी केली होती मात्र त्याआधीच नितेश राणे यांनी आधी जिल्हा न्यायालयात त्यानंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला मात्र तो फेटाळण्यात आला त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.









