जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे आडत दुकाना समोर खरेदी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या कट्ट्यांपैकी ५० कट्टे (पोते) १ लाख ८० रू किंमतीचे सोयाबीन चोरीचा गुन्हा उघडकीस आणत जामखेड पोलीसांकडून ३ आरोपींना अटक करण्यात यश मिळविले असून एक आरोपी फरार झाला आहे. तसेच या चोरीतील ३८ कट्टे ९५,५८० / – रू किंमतीचे सोयाबीन जप्त केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे या घटनेतील फिर्यादी नामे सुनिल भानुदास गायकवाड रा. जातेगांव यांनी आपल्या आडत दुकाना समोर खरेदी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या कट्ट्यांपैकी १ लाख ८० रूपये किंमतीचे.५० कट्टे (पोते) सोयाबीन दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजी चे रात्री २ : ३० वा ते ३: ०० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेले होते. याबाबत फिर्यादी नामे सुनिल भानुदास गायकवाड रा. जातेगांव ता. जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला गुरनं . 502/2021 भादवि कलम 379 , 34 प्रमाणे अज्ञात चोरटय़ांच्या विरोधत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेल्या माहितीनुसार दि. ११ जानेवारी २०२२ रोजी रात्री ८ : २८ वाजेच्या सुमारास
आरोपी नामे १) हनुमंत बापुराव तांबे (वय २७ वर्ष)
कवडवाडी, महासांगवी ता. पाटोदा जि. बीड
२) आण्णा भागवत कोठुळे (वय ३४ वर्ष) रा. जवळाला ता. पाटोदा. जि. बीड
३) झेलसिंग सरदारसिंग टाक (वय ३९ वर्ष) रा. पोलीस कॉलनी शेजारी, पाटोदा ता.पाटोदा जि. बीड या ३ चोरांना अटक करण्यात आली आहे तर करणसिंग टाक रा.जालना हा फरार झाला आहे.
वरील तिन्ही आरोपींना अटक करून पोलीस कस्टडी रिमांड दरम्याण आरोपी नामे हनुमंत तांबे याने गुन्हयातील चोरी केलेले सोयाबीन पाटोदा येथील श्रीगणेश ट्रेडर्स या आडत दुकानदार यांना विक्री केलेचे सांगितल्याने श्रीगणेश ट्रेडर्स या आडत दुकानामधुन ३८ कट्टे ९५,५८० रूपये किंमतीचे सोयाबीन जप्त करण्यात आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, कर्जत विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल शेषराव म्हस्के, आबा आवारे, विष्णु म्हेत्रे, संदीप आजबे यांनी केलेली आहे.
सदर गुन्हयाचा अधीक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संभाजी शेंडे हे करत आहेत.
परिसरातील अनेक ठिकाणी सोयाबीन चोरीच्या बातम्या येत होत्या जामखेड पोलीसांनी सोयाबीन चोराच्या मुसक्या आवळल्याने त्यांना अटक केल्याने जामखेड पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.








