जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
गेल्या वर्षापासून पासून सतत जामखेड नगर परिषदेच्या कर्मचारी वर्गाचे पगार, महिने – महिने मिळत नाहीत, सध्यस्थिती सफाई कर्मचार्यांचे पगार गेल्या 2 महिन्या पासून मिळाले नाहीत. यासाठी आज रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बे… मुदत संक्रात बंद आंदोलन अँड.अरुण जाधव यांच्या नेतृत्वा खाली जामखेड नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी जामखेड नगरपरिषदेच्या समोर कर्मचार्याच्या समवेत आंदोलन करण्यात आले.
ADVERTISEMENT

यावेळी बोलताना अँड. अरुण जाधव म्हणाले,जामखेड च्या नगरपरिषद प्रशासकीय व्यवस्थेला टक्केवारी ने पोखरले आहे, शासनाकडून कर्मचारी वर्गाच्या पगारासाठी येत असलेले पैसे, मुख्याध्याकारी दंडवते यांनी नगर परिषदेच्या इतर साहित्य खरेदीत वळवून, कर्मचाऱ्यांना जाणून बुजून वेठीस धरत आहेत, कारण निकृष्ट साहित्य खरेदीत टक्केवारी मिळते, ही गोष्ट पुढारी वर्गाला माहीतच आहे, पुढारी वर्गही यात गुंतला आहे का..? म्हणूनच या गोष्टी कडे आमदारांचे दुर्लक्ष होत आहे.आणि यामुळेच अधिकरी वर्गाकडून मनमानी कारभार चालू आहे
ऐन सनासुदीलाही जर, दोन महिने महिला कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसेल तर.. स्थानिक आमदार अश्या अधिकाऱ्यामुळे बदनाम होनार,आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन, पुढाऱ्यांनी यावर लवकर तोडगा काढावा,
कर्माचारी वर्गाला पगार मिळावा , यासाठी हे आंदोलन करत आहोत, तात्काळ लक्ष नाही दिले तर
आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल याकडे प्रशसनाने लक्ष द्यावे असे अँड.अरुण जाधव म्हणाले..
याप्रसंगी माजी उपसरपंच जाधव, प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, ता. अध्यक्ष अतिश पारवे, विशाल पवार, अझहर काझी, मुख्यतार सय्यद, अजिनाथ शिंदे, किशोर मोहिते, मा. सरपंच अंकुश पवार , बाबाभाई शेख, इस्माईल शेख, अरुण डोळस, नामदेव जगदाळे, गणपत कराळे, राकेश साळवे, मोहन शिंदे, भिमराव चव्हाण , बाळासाहेब खेत्रे, बाळासाहेब काळे, सतिष डिसले,बंकट खैरे, उमेश राऊत, आण्णा लोखंडे, विजय गायकवाड, भारत गायकवाड, अमोल सदाफुले, मिलींद घायतडक, सुनिल राऊत , मंदा मोरे, सिंधुबाई सदाफुले, केशरबाई घायतडक, सिमा गायकवाड तसेच सर्व आरोग्य कर्मचारी,विद्युत कर्मचारी, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनास पाठिंबा शेतकरी संघटनेचे रावसाहेब खोत, कांग्रेसचे जामखेड तालुका उपाध्यक्ष कुंडल राळेभात यांनी दिला.
चौकट
जामखेड नगरपरिषदे कडून होत असलेला भ्रष्टचार जामखेड ची जनता पाहत आहे, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, निवडणूक तोंडावर आल्याने विद्यमान पुढारी वर्गाला जनतेच्या समस्यांच्या रोषाला समोरो जावे लागणार आहे.
अँड.डॉ.अरुण जाधव – भटके विमुक्त राज्य समन्वयक – वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र राज्य









