जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
कर्जत-जामखेडचे भाग्य विधाते माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चाच्या वतीने शनिवारी भव्य राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात राज्यभरातील २७ संघांनी सहभाग घेतला होता यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जय हनुमान क्रीडा मंडळ महासांगवी या संघाने पटकावले आहे. अशी माहिती युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.
प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. १/१ /२०२२ रोजी दुपारी बारा वाजता गोडाऊन मैदान बस स्टँड मागे जामखेड येथे स्पर्धा घेण्यात आली
या कार्यक्रमासाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, भाजपाचे जिल्हा संघटक बाळासाहेब महाडिक, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, जिल्हा परिषद सदस्य आनिल लोखंडे, सोमनाथ पाचरणे, माजी पंचायत समितीचे सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, ज्योती क्रांती पतसंस्थेचे चेअरमन अजिनाथ हजारे, नगरसेवक बिभिषण धनवडे, शामीर सय्यद, शिवछत्रपती पुरस्कार विजेते कबड्डी खेळाडू पंकज शिरसाट, उपसभापती रवी सुरवसे, संजय कार्ले, राजेंद्र देशपांडे, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टाफरे, अॅड प्रवीण सानप, सरपंच लहु शिंदे, मनोज कुलकर्णी, तुषार बोथरा,
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुराजे भोसले, ह. भ. प. दिपक महाराज गायकवाड, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेतील प्रथम येणाऱ्या संघास प्रा. राम शिंदे मित्रमंडळ चौंडी यांच्या तर्फे ४१ हजार रुपये बक्षीस होते ते जय हनुमान क्रीडा मंडळ महासांगवी या संघाने पटकावले,
द्वितीय बक्षिस ज्योती क्रांती उद्योग समूहाचे चेअरमन अजिनाथ हजारे यांच्या तर्फे ३१ हजार रुपये होते ते महासंग्राम युवा मंच पुणे यांनी पटकावले,
तृतीय बक्षिस जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर यांच्या तर्फे २१ हजार रुपये होते ते धस दादा फिटनेस क्लब आष्टी या संघाने पटकावले तर
चतुर्थ बक्षिस जिल्हा परिषद सदस्य आनिल लोखंडे यांच्या तर्फे ११ हजार रुपये होते ते बालेवाडी क्रीडा मंडळ पुणे यांनी पटकावले अशी माहिती युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले यांनी दिली.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून महादेव रकटे सर, सतिष उबाळे सर, भिमा माने सर, निमोणकर सर, अनिल जगदाळे सर, संदिप उबाळे सर, कैलास जगदाळे सर, योगेश तांदळे सर, योगेश सानप सर हे असतील तर निवेदक म्हणून राजेंद्र सोनवळकर पाटील पुणे हे होते.
शनिवारी दि. १/१ /२०२२ रोजी दुपारी बारा वाजता गोडाऊन मैदान बस स्टँड मागे जामखेड येथे स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेसाठी परिसरातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते कबड्डी खेळाडू पंकज शिरसाट यांची खास उपस्थिती होती. परिसरातील नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे सामने झाले. सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.