पंकजा मुंडेंना ओमायक्रोनची लागण ; मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन

0
225
जामखेड न्युज – – – – 
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या नव्या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडेंना याआधी एप्रिल 2020 मध्येदेखील कोरोनाची लागण झाली होती.
त्यामुळे पंकजा यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना ओमायक्रोची लागण झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे त्यांचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आज समोर आला असून त्यांना ओमायक्रोनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे
तरीही पंकजा यांची प्रकृती ठीक असून काळजी करण्यासारखं काही नाही, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित, अजित पवारांंची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज सकाळी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी राज्यातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित असल्याची माहिती दिली. “काळजी घ्या कोरोनामुळे स्थिती फार वेगाने खराब होतेय.
राज्याचे 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोना बाधित आहेत. सगळ्यांना नियम पाळावे लागतात स्थिती जर आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल”, असं अजित पवार म्हणाले. ‘लोकांनी पहिल्या-दुसऱ्या लॉकडाऊनचे चटके सोसलेत’, महाराष्ट्राच्या संवेदनशील आरोग्यमंत्र्यांचं महत्त्वाचं विधान राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर अनेकांना कोरोना राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं. या हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेल्या अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. विधीमंडळात कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
तसेच विधान भवन परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या काही पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा फोफावताना दिसतोय. नागपुरात तर आज 80 पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यातही हाच आकडा 400 च्या पुढे गेला आहे.
मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट गतीने वाढतोय. त्यामुळे चिंता वाढली आहे. राज्यात 10 मंत्री आणि 20 आमदारांना Corona; लग्नसोहळे अन् राजकीय नेते ठरतायत सुपर स्प्रेडर लग्न सोहळ्यांमधूनही कोरोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांत राजकीय नेते, आमदार हे विविध लग्नसमारंभात सहभागी होताना दिसले. या लग्नसमारंभात मोठी गर्दी झाल्याचंही दिसून आलं आणि हीच गर्दी कोरोनाची सुपरस्प्रेडर ठरल्याचं दिसत आहे.
जर राजकीय नेते आणि मंत्री महोदय नियमांकडे दुर्लक्ष करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांकडून नियमांचे पालन कसे होणार असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. त्यानंतर 30 डिसेंबर रोजी हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली होती. हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचा विवाह बिंदुमाधव ठाकरे यांचायम मुलासोबत झाला. त्यामुळे या लग्नसोहळ्यात राजकीय नेत्यांसोबत इतरही व्हीआयपींनी उपस्थिती लावली होती. या लग्नात खासदार सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात हे सुद्धा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here