Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भव्य...

माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

0
236

जामखेड प्रतिनिधी

          जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
      कर्जत-जामखेडचे भाग्य विधाते माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चाच्या वतीने शनिवारी भव्य राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.
 
      प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. १/१ २०२२ रोजी दुपारी बारा वाजता गोडाऊन मैदान बस स्टँड मागे जामखेड येथे स्पर्धा होईल. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आमदार सुरेश (आण्णा) धस तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ सुजय विखे-पाटील असतील तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, जिल्हा परिषद सदस्य आनिल लोखंडे, माऊली (आप्पा) जरांगे, सोमनाथ पाचरणे, माजी पंचायत समितीचे सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, उपसभापती रवी सुरवसे, संजय कार्ले, राजेंद्र देशपांडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
   या स्पर्धेतील प्रथम येणाऱ्या संघास प्रा. राम शिंदे मित्रमंडळ चौंडी यांच्या तर्फे ४१ हजार रुपये, द्वितीय बक्षिस ज्योती क्रांती उद्योग समूहाचे चेअरमन अजिनाथ हजारे यांच्या तर्फे ३१ हजार रुपये, तृतीय बक्षिस जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर यांच्या तर्फे २१ हजार रुपये, चतुर्थ बक्षिस जिल्हा परिषद सदस्य आनिल लोखंडे यांच्या तर्फे ११ हजार रुपये ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.
    या स्पर्धेसाठी पंच म्हणून महादेव रकटे सर, सतिष उबाळे सर, भिमा माने सर, निमोणकर सर, अनिल जगदाळे सर, संदिप उबाळे सर, कैलास जगदाळे सर, योगेश तांदळे सर, योगेश सानप सर हे असतील तर निवेदक म्हणून राजेंद्र सोनवळकर पाटील पुणे हे असतील.
     शनिवार दि. १/१ /२०२२ रोजी दुपारी बारा वाजता गोडाऊन मैदान बस स्टँड मागे जामखेड येथे स्पर्धा होईल.
अशी माहिती जामखेड भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!