Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या ‘शिकू आनंदे’ उपक्रम ठरतोय  राज्यात विद्यार्थीप्रिय- नान्नजच्या मोहळकरवस्ती शाळेतील प्रशांत कुंभार यांचे...

‘शिकू आनंदे’ उपक्रम ठरतोय  राज्यात विद्यार्थीप्रिय- नान्नजच्या मोहळकरवस्ती शाळेतील प्रशांत कुंभार यांचे अप्रतिम सादरीकरण

0
250
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचे द्वारे दर शनिवारी इ.1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 9 ते 10 तर इ.6ते 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 10 ते 11 या वेळेत विद्यार्थ्यांसाठी कला, क्रीडा, नृत्य, गायन व प्रश्नमंजुषा या माध्यमातून आनंददायी पद्धतीने  ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून मागील सहा महिन्यांपासून नियमित सुरू असलेल्या या उपक्रमात राज्यातील लाखो विद्यार्थी आनंदाने सहभाग घेत असल्याचे निष्पन्न होत आहे.
 
   यामध्ये प्रत्येक आठवड्यात राज्यभरातील विविध  जिल्ह्यांतील उपक्रमशील शिक्षक सहभागी होऊन आपल्या कलेचे सादरीकरण करतात. शनिवार दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी या उपक्रमाचा 23 वा भाग प्रसारित झाला  असून यात जि. प.प्राथ.शाळा मोहळकरवस्ती, नान्नज तालुका – जामखेड येथील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक श्री. प्रशांत कुंभार यांनी ‘Fun time quiz Time’
या कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
 राज्यभरातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या रंगतदार प्रश्नांच्या मालिकेत भाग घेतला.  त्यांचेसह  राज्यभरातून सहभागी झालेल्या शिक्षकांनी कवायत, हस्तकला, नृत्य, गायन, प्रश्नमंजुषा यासारख्या उपक्रमांचे सादरीकरण केले. कोरोना काळात शिक्षण सुरू राहण्यासाठी राज्याचे शिक्षण संचालक मा.श्री. दिनकर टेमकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कृतीशिल शिक्षक महाराष्ट्रचे राज्यसंयोजक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ व ज्योती बेलवले यांच्या  मार्गदर्शनातून हा कार्यक्रम पार पडतो. अनेक शाळांमध्ये , घरांमध्ये दर शनिवारी मुले या कार्यक्रमात स्वयंस्फूर्तीने कृतीयुक्त सहभाग घेताना दिसतात. हेच या कार्यक्रमाचे मोठे यश आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी श्री.प्रशांत कुंभार यांना  शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब कुमटकर ,सर्व पालक, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष मेहेर यांचे सहकार्य लाभले. उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, गटविकासअधिकारी प्रकाश पोळ यांच्यासह तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांनी श्री.कुंभार यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!