जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये श्रीनिवास रामानुजन राष्ट्रीय गणितदिन विद्यार्थ्यांसाठी उत्साहात सोशल डिस्टन्स ठेवून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष प्राचार्य श्रीकांत होशिंग,प्रमुख पाहुणे व्याख्याते प्राध्यापक प्रफुल्लचंद्र लक्ष्मण पवार अहमदनगर कॉलेज अहमदनगर व उपप्राचार्य सुनील नरके जामखेड महाविद्यालय जामखेड,उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, उपप्राचार्य पोपट जरे,पर्यवेक्षक रमेश अडसूळ व प्राध्यापक आजिनाथ शिरसाट उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक रमेश अडसूळ यांनी केले या मध्ये विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताविषयी भीती कमी व्हावी या उद्देशाने आजचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे व त्यासाठी प्राध्यापक श्री प्रफुलचंद्र पवार सर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे व रामानुजन यांच्या बद्दल थोडक्यात माहिती दिली.
त्यानंतर व्याख्याते प्राध्यापक प्रफुल्लचंद्र पवार सर यांनी आपल्या व्याख्यानांमध्ये प्रथम विद्यार्थ्यांनी अतिशय छान पोस्टर तयार करून त्याचे प्रदर्शन भरवले आहे याबद्दल विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.
त्यानंतर गणित विषयातील आयडिया (क्लुप्त्या) मॅजिक चार्ट द्वारे तसेच प्रोजेक्टर द्वारे विद्यार्थ्यांना गणितीय पद्धती याबद्दल अतिशय उत्कृष्ट अशी माहिती दिली.शून्याचा शोध इसवीसन 500 च्या सुमारास भारतातील आर्यभट्ट यांनी लावला होता.शून्याचा शोध लागण्यापूर्वी गणितामध्ये एक ते नऊ अंकाचा वापर केला जात होता.आर्यभट्ट यांचा जन्म 476 मध्ये भारतातील कुसुंपुर येथे झाला. त्याचबरोबर रामानुजन यांची गणित वारी सिद्धांत प्रसिद्ध झाला. एका वर्षात 23 जनरल प्रसिद्ध रॉयल सोसायटीची फेलोशिप याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्याचबरोबर गोल्डन नंबर बद्दल ही माहिती दिली. व्याख्यानांमध्ये हसत-खेळत विद्यार्थ्यांच्या मनावरील गणिताची भीती कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न व विद्यार्थ्यांना त्याचबरोबर गणिताची गोडी निर्माण होण्याचा प्रयत्न हेच आजच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या व्याख्यानाचे विशेष होय.
त्यानंतर प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये श्री प्रफुलचंद्र पवार सर यांचे मनोमन धन्यवाद देतांना त्यांना अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आमंत्रण असतानाही त्यांनी ल.ना.होशिंग विद्यालयात येऊन विद्यार्थ्यांसाठी वेळ दिला तेव्हा आपल्या माजी विद्यार्थ्याविषयी अभिमान व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले.
त्याचबरोबर स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने 75 पोस्टर गणितीय माहिती तक्ते यांचे प्रदर्शन तयार केले. आहे. विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त उपयोग होईल असे सांगितले. यानिमित्ताने शाळे मधील सर्व फलकांवर गणितीय तक्ते तयार करण्यात आले व गणित प्रदर्शन भरवण्यात आले. त्यासाठी पर्यवेक्षक श्री रमेश आडसुळ, शहाजी वायकर, बाबासाहेब समुद्र, सुरज गांधी, विजय क्षीरसागर, अजित सांगळे व कलाशिक्षक राऊत मुकुंद, संगीता दराडे, रोहित घोडेस्वार, आदित्य देशमुख, स्वप्नील जाधव आदि शिक्षकांनी प्रदर्शनासाठी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शहाजी वायकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे यांनी केले









