Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!!!

दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!!!

0
251
जामखेड न्युज – – – 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ) 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेचे (SSC Exam 2022) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे. दहावीची परीक्षा नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मागच्या आठवड्यात जाहीर केले होते. त्यानंतर आता दहावीच्या लेखी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दहावीची बोर्डाची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे. तर 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान दहावीची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे. आता कोणत्या दिवशी कोणता पेपर असणार आहे याबाबतचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे.
या दिवशी असेल या विषयाचा पेपर –
15 मार्च – प्रथम भाषा
16 मार्च – द्वितीय किंवा तृतीय भाषा
21 मार्च – हिंदी
22 मार्च – संस्कृत, उर्दू, गुजराती आणि इतर द्वितीय आणि तृतीय भाषा
24 मार्च – गणित भाग 1
26 मार्च – गणित भाग 2
28 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
30 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
1 एप्रिल – समाजिक शास्त्र पेपर 1
4 एप्रिल – समाजिक शास्त्र पेपर 2
दरम्यान, दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ (Extension for online applications) देण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शाळांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कांसह 26 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहे. तर विलंब शुल्कासह 27 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. शिक्षण विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अर्ज भरला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!