जामखेड न्युज – – – –
घरासमोर शतपावली करत असलेल्या दोन
सख्ख्या बहिणींना भरधाव आलेल्या स्कार्पिओने जोराची धडक दिली. या अपघातात दोघींनाही दोनशे फूट अंतर फरफटत नेले. गंभीररित्या जखमी झालेल्या दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवी घटना पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे रविवारी (दि.19) रात्रीच्या सुमारास घडली. तर अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
मोहिनी गाडेकर (वय 27) व रोहिणी गाडेकर (वय 23) या दोन सख्ख्या बहिणी रविवारी रात्री घरापुढे शतपावली करत होत्या. त्याच दरम्यान विरूध्द दिशेने आलेल्या स्कॉर्पिओने (एम.एच.12 एम.आर. 9113) दोघींना उडवले आणि दोनशे ते तीनशे फूट फरफटत नेत जबर जखमी केले. तसेच स्कॉर्पिओने दुचाकीलाही उडवले. यात अजित मोरे, संतोष आगे हे दोन तरूण जखमी झाले. दरम्यान, गावकऱ्यांनी जखमी तरुण-तरुणींना पाटोदा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. परंतु तरुणींची तब्येत बिघडल्याने त्यांना बीड जिल्हा रूग्णालयाकडे दाखल करण्यास सांगितले. रुग्णालयात नेत असतानाच दोघींची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्याची प्रक्रिया सुरु होती.



