Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या सामाजिक साहाय्य योजनेच्या तालुका स्तरीय समितीची बैठक संपन्न.

सामाजिक साहाय्य योजनेच्या तालुका स्तरीय समितीची बैठक संपन्न.

0
320
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – – – 
जामखेड तालुक्यातील विशेष  सामाजिक साहाय्य योजनेच्या अनुषंगाने लाभार्थी यांची निवड  करण्यासाठी आज दिनांक २० रोजी तालुकास्तरीय  सामाजिक साहाय्य योजना तालुका स्तरीय  समितीची बैठक पार पडली. यात सर्व शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला.
सदर तालुकास्तरीय समिती मध्ये महाराष्ट्र शासन निर्णय २० ऑगस्ट २०१९ नुसार माननीय पालक मंत्री अहमदनगर यांनी शिफारस केलेले आणि माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाने नियुक्त झालेले अध्यक्ष आणि सदस्य यांचा समावेश होतो. जामखेड तालुका स्तरीय समिती मध्ये अध्यक्ष म्हणून विद्यमान पंचायत समिती सभापती श्रीमती राजश्री सुर्यकांत मोरे मौजे रत्नापूर, अशासकीय सदस्य म्हणून श्री राजू पाचारे मौजे घोडेगाव, श्री बबन देवकाते मौजे  शिऊर , श्री संतोष निघुडे मौजे अरणगाव तसेच महिला सदस्य म्हणून श्रीमती कांचन अनिल भोरे मौजे देवदैठण यांची निवड केलेली आहे. सदस्य सचिव म्हणून तहसीलदार जामखेड हे आहेत.
    सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली . बैठकीच्या सुरवातीस सर्वांचे स्वागत करण्यात आले. तालुकास्तरीय सर्व योजनांचा आढावा थोडक्यात देण्यात आला. तसेच  समिती स्थापन होण्याच्या  अगोदर माहे जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीतील मंजूर प्रकरणांचा आढावा देय्ण्यात आला . माहे जानेवारी २०२१ ते   ऑक्टोबर २०२१ या कालावधीत  प्रलंबित असणारे संजय गांधी निराधार योजनांचे एकूण १७४ अर्ज प्राप्त झाले होते त्यापैक १५३ अर्ज मंजूर करण्यात आले होते आणि २१ अर्ज विविध कारणासाठी नामंजूर करण्यात आले होते.
     श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना अंतर्गत एकूण ९३ अर्ज प्राप्त झाले त्यापैकी ६१ आर्ज मंजूर करण्यात आले आणि ३२ अर्ज नामंजूर करण्यात आले. असे एकूण २६७ आर्ज प्राप्त झाले त्यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये तहसीलदार यांनी बैठक घेऊन त्यापैकी २१४ अर्ज मंजूर तर ५३ अर्ज नामंजूर करण्यात आले याची माहिती देण्यात आली. आजच्या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजनांचे २६ अर्ज तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेचे ७ असे एकूण ३३ अर्ज   मंजूर करण्यात आले तर ६ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. आजच्या बैठकीमध्ये समाजातील सर्व पात्र लाभार्थी यांचे प्रकरण मंजूर करावे तसेच सर्व पात्रलाभार्थी यांना वेळेवर अनुदान वाटप करण्यता यावे, लाभार्थी निवड करण्यासाठी  साठी गावनिहाय कॅम्प पुढील कालावधीमध्ये घेण्यात यावे अशा सूचना अध्यक्ष आणि सदस्य यांनी दिल्या. बैठकीत राष्ट्रीय आर्थिक कुटुंब लाभ योजनेचे लाभार्थी याना आदेश वाटप करण्यात आले.
     बैठकीचे आभार नायब तहसीलदार श्री महाले यांनी करून बैठक संपविण्यात आली. सदर बैठकीस श्री कारखिले अव्वल कारकून संजय गांधी योजना, श्री दासरी अव्वल कारकून इंदिरा गांधी यांनी नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!