नशेत चिरडले तीन मित्रांना – कार रिव्हर्स घेत असताना झाला अपघात!!

0
225
जामखेड न्युज – – – 
नागपूर शहरालगत एका कार चालका कडून कार रिव्हर्स घेताना विचित्र अपघात झाला. या अपघातात कार चालकाने आपल्या सोबत आलेले तीन मित्रांना गाडी खाली चिरडले. यात एक सुरक्षित बचावला, एक किरकोळ जखमी झाला तर एक बेसावध असल्याने कार खाली चिरडला गेल्याने गंभीर जखमी झाला.
हे चार मित्र नागपूर शहराजवळ एका धाब्यावर जेवणासाठी थांबले, यावेळी त्यांनी मद्यप्राशन केले असल्याचे वृत्त आहे. जेवण आणि मद्य प्राशन केल्यानंतर तीन मित्र धब्याबाहेर असलेल्या एका बाकड्यावर बसले आणि गप्पा मारत होते. या वेळी कार चालवणारा चौथ्या मित्राने कार रिव्हर्स घेत असताना त्याचे नशेत वाहनवरील नियंत्रण सुटले. गडबडीत ब्रेक ऐवजी त्याने एक्सलेटरवर पाय पडला म्हणे आणि कारने जोर्यात मागील बाजूने वेग घेतला.
कार अचानक मागे आली आणि कार ने बाकड्यावर बसलेल्या तीन मित्रांना घेरले. यावेळी एका सावध असलेल्या मित्राने कसाबसा आपला बचाव केला, मात्र इतर दोन मित्र कार खाली आले. त्यात एक मित्र किरकोळ तर एक बेसावध असलेला मित्र चाकाखाली आला आणि गंभीर जखमी झाला.
नागपूर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here