जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
सन १९७१ चे भारत पाक युद्ध अवर्णनीय, अकल्पनीय व अनाकलनीय होत, सैनिकांच्या गाथा पुन्हा पुन्हा सांगाव्या व वाचाव्यात. तसेच त्या पुन्हा पुन्हा जगासमोर आणाव्यात जेणे करून नव्या पिढीला त्यापासून प्रेरणा मिळत राहावी यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या पराक्रमाचे विविध दिवस महोत्सवासारखे साजरे करावेत. असे प्रतिपादन सुभेदार मेजर सदानंद होशिंग यांनी केले
सन १९७१ सालच्या भारत पाक युद्धाच्या विजयी दिवसानिम्मीत आदरांजली वाहण्यासाठी विषेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जामखेड येथील शिवनेरी अकॅडमी येथे पार पडलेल्या या विजयी दिनाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन येथील प्रहार सैनिक कल्याण संघ व आजी माजी सैनिक तसेच शिवनेरी करिअर अकॅडमी यांच्या वतीने यावेळी सुभेदार मेजर सदानंद होशिंग, श्रीमती मीना होशिंग, जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, प्रहार सैनिक कल्याण संघ कांतीलाल कवादे, जामखेड पाॅलिटेक्निक काॅलेजचे प्रिन्सिपॉल विकी घायतडक, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, नय्युम शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, डॉ. कैलास हजारे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, हरिभाऊ आजबे, रामचंद्र इंगळे, माजी नगरसेवक दिगांबर चव्हाण, संभाजी राळेभात, नकुल भागडे, माजी सैनिक रवि शेळके, गोरक आजबे, अरविंद जाधव, नारायण नागरगोजे, पोपट सांगळे, योगेश सुरवसे, अशोक चव्हाण, तानाजी गर्जे, रामचंद्र वाळूंजकर, दादासाहेब थोरवे, चंद्रकांत साळवे, केशव गोपाळघरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सुभेदार मेजर सदानंद होशिंग म्हणाले की, हा विजय सर्वार्थाने अतिशय वेगळा आहे. कारण जगाच्या इतिहासात अशा कोणताही देश की ज्याने अवघ्या १३ दिवसात शत्रू राष्ट्राला बिनशर्त शरणागती पत्करायला लावली. व ९३ हजार शत्रू सैनिकांना युध्दबंदी बनवले. तसेच १ लाख ६३ हजार ४७० चौरस किलोमीटर प्रदेश भारतीय सैन्याने जिंकला होता. त्यामुळे आपल्या सैनिकांचा आपण अभिमान बाळगावा व त्यांचे सतत स्मरण व्हावे म्हणून असे दिवसे साजरे होणे गरजेचे आहे. असे गौरवोद्गार काढत त्यांनी विजयी दिवसानिम्मीत सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, आज १९ ७१ च्या भारत पाक युध्दाचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात आहे. भारताने जो विजय मिळविला तो कायमस्वरूपी वाखाणण्याजोगा आहे. या युद्धात जे जे शहिद झाले त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून ज्यांनी ज्यांनी आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा केली त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण हा विजय दिन साजरा करत आहोत. हा विजय सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. यापासून सर्व तरूणांना प्रेरणा मिळत राहील. तसेच या युद्धात आपल्या भागातीलही काही सैन्य होते. यामध्ये कर्णल काशिद हेही त्या युध्दाचे प्रत्येक्ष साक्षीदार होते. त्यांचे गेल्या सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांची भेट होणे हे आपल्यासाठी भाग्याचेच म्हणावे लागेल.
प्रस्ताविक शिवनेरी अकॅडमीचे संचालक सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मणराव भोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहालयाचे समन्वयक योगेश अब्दुले यांनी केले.





