कवी आ.य.पवारांची विज्ञान कविता मराठी भाषेला भूषणावह. –    प्रा. मधुकर राळेभात

0
514
जामखेड  प्रतिनिधी
           जामखेड न्युज – – –
 मराठी भाषेत विज्ञान कविता दुर्मिळ आहेत.आ.य.पवारांनी दर्जेदार निसर्ग व विज्ञान कविता लिहिल्या असून मान्यवर समीक्षकांनी त्यांच्या कवितेची संपादने प्रसिद्ध केली आहेत. यापूर्वी त्यांच्या विज्ञान कविता नांदेड व नागपूर विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रमासाठी समाविष्ट केल्या आहेत. आणि  या वर्षीपासून तर त्यांचा  बासष्ट
कवितांचा ‘ धूळपेर  ‘ काव्यसंग्रह कर्नाटक विद्यापीठाने पदवी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे.
 आ.य.पवारांची निसर्ग व विज्ञान कविता मराठी भाषेला भूषणावह आहे ”  असे विचार अध्यक्षीय भाषणात
प्रा.मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले. येथील जिव्हाळा फौंडेशन व सर्व धर्मियांच्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांचा ४२ वा वाढदिवस आणि कर्नाटक विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रसिद्ध कवी प्रा.आ.य.पवारांचा ‘ धूळपेर’  काव्यसंग्रह समाविष्ट झाल्याने, दोन्ही मान्यवरांचा सत्कार समारंभ बसस्थानक समोरील जिजाऊ नगरमध्ये सामाजिक व राजकीय कार्यकर्ते प्रा.मधुकर राळेभात यांचे अध्यक्षतेखाली नुकताच  संपन्न झाला.
    कार्यक्रमाचे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचि पूजा करण्यात आली. मुख्याध्यापक
राम निकम सरांनी प्रास्ताविक भाषणात  पोलिस निरीक्षक
गायकवाड व साहित्यिक प्रा. आ.य.पवार यांच्या कार्य कर्तृत्वाचा परिचय करून दिला. यावेळी त्यांनी  नागपूर विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी असलेली
पवारांची ‘ विश्वाचे नवल’ ही विज्ञान कविता भावार्थाने स्पष्ट
केली व   प्रा.पवार व पी.आय. गायकवाड यांचा शाल, पुष्पहार देऊन टाळ्यांच्या गजरात सत्कार करण्यात आला.
दोन्ही सत्कारमूर्तींनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी
गुलाबराव जांभळे, कुंडल राळेभात, शेख सर, यांची भाषणे
झाली. सरसमकर सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.आभार रंगनाथ राळेभात यांनी मानले.कार्यक्रमास  डॉ जतीन काजळे, इंजिनिअर वारे, भोंडवे सर,उमर कुरेशी, जुबेर सय्यद, गणेश वारे, जावेद सय्यद अवधूत पवार, बाळासाहेब राऊत संतोष घोलप सर, जाकीर शेख सह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here