जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
काँग्रेस च्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरदचंद्र पवार साहेब आणि युवक काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष व जामखेड हमाल पंचायत चे अध्यक्ष राहुल उगले यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथे आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 102 कार्यकर्त्यांनी या शिबिरात रक्तदान केले.विशेष म्हणजे या शिबिरात महिला आणि मुलींनी देखील रक्तदान केले.
कोरोना काळात राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे याचं अनुषंगाने काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी, महाविकस आघाडी चे शिल्पकार शरदचंद्र पवार साहेब, युवक काँग्रेस चे कार्यकारी जिल्हाध्यक्ष राहुल उगले यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस शहराध्यक्ष देवीदास भादलकर, युवक काँग्रेस ता.अध्यक्ष शिवराजे घुमरे, युवक शहराध्यक्ष विक्रांत अब्दुले यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी काँग्रेस चे ता.अध्यक्ष शहाजी राजेभोसले, रा.काँ. चे विधानसभा अध्यक्ष मधुकर रालेभात, महिला काँग्रेस अध्यक्षा ज्योतीताई गोलेकर, रा. काँ. ता.अध्यक्ष दत्तात्रय वारे, निलेश निघुडे,नगरसेवक दिगंबर चव्हान,नगरसेवक पवन रालेभात, युवा नेते गणेश वारे, गणेश मस्के, अनिल बाबर, अवधुत पवार, माजी उपसभापती विलास मोरे, जुबेरभाई शेख, चांदभाई तांबोळी,गणेश शेठ डोंगरे,अमोल गिरमे,नगरसेवक मोहन पवार, महादेव बहिर,नगरसेवक अमित जाधव, हर्षल डोके, युवा नेते महेंद्र राळेभात,रोहित खरात,अनिकेत जाधव, सुरज पवार , आप्पा देवकाते आदी सह अनेक मान्यवरांनी भेट दिली.एकूण 102 जणांनी रक्तदान केलं विशेष म्हणजे महिलांनी आणि युवती नी पण रक्तदान करण्यात पुढे होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





