जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
सैन्यात दाखल झालेल्या प्रत्येक सैनिकाला आपल्याला देशासाठी विरमरण यावे अशी इच्छा असते. सैनिकांच्या जिवावर आपण आपले जिवन सुरक्षित जगात आहोत. अशा सैन्य दलाच्या प्रमुखाचे अपघाती निधन होणे देशाच्या व आपल्या दृष्टीने दुर्दैवी घटना आहे. त्या जाण्याचे देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. अशा महान देशभक्तांना परमेश्वराने त्याच्या जवळ चांगली जागा द्यावी असे भावपूर्ण उद्गार जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी काढले.
आकस्मित हेलिकॉप्टर क्रॅश दुर्घटनेत शाहिद झालेले तिन्ही सेनांचे समन्वयप्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत व त्यांच्या धर्मपत्नी तसेच त्यांच्या सोबत शाहिद झालेले अधिकारी व सर्व जवान यांना प्रहार सैनिक कल्याण संघ, शिवनेरी करिअर अकॅडमी व सर्व आजी माजी सैनिक जामखेड या सर्वांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रा. मधुकर राळेभात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दि १० डिसेंबर रोजी सकाळी ११: ०० वाजता जामखेड येथील शिवनेरी करिअर अकॅडमी येथे या शहिद विरांना श्रध्दाजंली अर्पण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आजी-माजी सैनिक, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय व पोलीस बांधव आदि सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी जनरल बिपीन रावत व त्यांच्या धर्मपत्नी व ईतर शहीद सैनिकांचे फोटो असलेल्या फोटो फ्रेमला पुष्पहार व पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. मधुकर राळेभात, तहसीलदार योगेश चंद्रे, प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष कांतीलाल कवादे, निवृत्त पोलीस निरीक्षक दिलीप पोले, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडूराजे भोसले, आम आदमी पार्टीचे सतोष नवलाखा, प्रहार संघटनेचे पदाधिकारी गणेश हगवणे, माजी नगरसेवक पवन राळेभात, महाराष्ट्र बेकरीचे संचालक अमित गंभीर, माजी सैनिक एम. जी. गौड, एस. एम. गौड, ए. ई. जाधव, आर. यु. शेळके, पी. व्ही. सांगळे, ए. के. चव्हाण, तानाजी गर्जे, रमेश मोरे, केशव गोपाळघरे, नारायण नागरगोजे, सुदेश दुगम, ग्रामस्थ व शिवनेरी अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित होते.
यावेळी कांतीलाल कवादे, पांडूराजे भोसले, जयसिंग उगले, दिलीप पोले, अमित गंभीर, गणेश हगवणे यांनीही आपल्या मनोगतातून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी प्रहार सैनिक कल्याण संघ, शिवनेरी करिअर अकॅडमी, आजी माजी सैनिक जामखेड च्या वतीने
शिवनेरी अकॅडमीचे संचालक सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मणराव भोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनीही आपल्या शाश्रु नयनांनी श्रद्धांजली अर्पण केली. सुत्र संचलन व आभारही त्यांनीच मानले.









