Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या पाळत ठेवून महिलांची पर्स चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी अटक, मुद्देमाल जप्त

पाळत ठेवून महिलांची पर्स चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी अटक, मुद्देमाल जप्त

0
282
जामखेड न्युज – – – 
 दिनांक 7 डिसेंबर रोजी सावेडीत गुलमोहर रोडवरील स्वीट होम दुकाना मागील भागातून एका महिलेच्या सायकलला लावलेली पर्स बाजबरीने ओढून लुटली होती. याबाबाय तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबात पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी ठाण्याच्या शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, धीरज खंडागळे, चेतन मोहिते यांनी दाखल गुन्हा भादवी कलम 392, 34 नुसार तपास करत गुन्ह्यातील संशयित हे नागपूर एमआयडीसी परिसरात जिमखाना ग्राऊंड इथे असल्याचे तपासात शोधले. यात गणेश देविदास नल्ला (वय 23, श्रमिक नगर, अहमदनगर), शैलेश दत्तात्रय फाटक (वय 20, जिमखाना ग्राऊंड समोर) यांना विश्वासात घेत माहिती विचारली असता त्यांच्या कडे असलेली आनंदऋषी  हॉस्पिटल येथून चोरलेली मोपेड ऍक्टिवा चोरल्याचे तसेच स्वीट होम मागे महिलेच्या सायकलवरील पर्स बळजबरीने चोरल्याची कबुली दिली.
(पो.नि.ज्योती गडकरी, तोफखाना पोलीस स्टेशन)
सदर गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी2हस्तगत केला असून 2आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. मुद्देमालात रोख1400 रुपये, चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी, आणि एकूण 18 रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास पो नि ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पो नि समाधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!