जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड साकत रस्त्यावर पोद्दार शाळेजवळ रस्त्यावर एक मोठा खड्डा होता या खड्ड्यांमुळे शेकडो वाहनचालकांना त्रास होत होता काही अपघातही होत होते. या रस्त्याने अनेक शिक्षकांनाही ये – जा करावी लागत होती. त्यामुळे शिक्षकांनी एकत्र येऊन खड्डा बुजविला यामुळे रस्त्यावरून ये जा करणार्या लोकांनी शिक्षकांना धन्यवाद दिले आहेत. सोशल मिडीयावर शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT 

साकत रोडवर पोद्दार शाळेनजीक गेल्या चार महिन्यापासून अपघाताच्या छोट्यामोठ्या बातम्या येत होत्या. अनेक मोटारसायकली पडून लोक जायबंदी होत होते.याचे कारण होते. सरळ व सफाईदार असणाऱ्या रस्त्यावर अचानक आडवा आलेला दिड फुटाचा समतल खड्डा यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत होते.
ADVERTISEMENT 

आज काही मित्रांनी श्रमदान करुन हा खड्डा बुजविला.
ADVERTISEMENT 

यावेळी एक एक करीत अनेकजण जमा झाले.पाटोदा येथील पवन तांदळे, रज्जु साखरे, जालिंदर यादव, तय्यब शेख, संतोष सरसमकर यश आजबे, अथर्व लोमटे यांनी श्रमदान करुन संवेदनशीलता दाखविली.
ADVERTISEMENT

यामुळे शिक्षकांनी अशीही समाजसेवा अशी चर्चा रंगली आहे व खड्डा बुजवणार्या सर्वाचे अभिनंदन होत आहे.




